Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

बीएमसीला मिळाले कोविशिल्ड लसीचे ९९ हजार डोस

मुंबईसह महाराष्ट्रात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत मुंबईत १६ लाख १४ हजार २७८ डोस देण्यात आले आहेत.

बीएमसीला मिळाले कोविशिल्ड लसीचे ९९ हजार डोस
SHARES

लसीअभावी मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागली होती. मात्र, आता ही केंद्रे पुन्हा सुरू झाली आहेत.  केंद्र सरकारकडून झालेल्या पुरवठ्यापैकी ९९ हजार कोविशिल्ड लशीचे डोस मुंबई महापालिकेला मिळाले आहेत. 

मुंबईत ७१ खासगी केंद्र आहेत. लस उपलब्ध नसल्याने सर्व खासगी केंद्र मुंबई मनपाने शुक्रवारपासून बंद केली होती. मात्र, आता लस मिळाल्याने लसीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. 

मुंबईसह महाराष्ट्रात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत मुंबईत १६ लाख १४ हजार २७८ डोस देण्यात आले आहेत. मुंबईत एकूण ११८ लसीकरण केंद्र आहेत. त्यांपैकी ७१ खाजगी केंद्र आहेत. यामधील एच.एन.रिलायन्स, ब्रिच कॅन्डी, हबीब, भाटीया, एलिझाबेथ, लायन हॉस्पिटल, सिटी केअर, लाईफलाईन, भाभा हॉस्पिटल ही लसीकरण केंद्र बंद झाली होती. 

दरम्यान,केंद्र सरकार मदत करत आहे मात्र, ती अपेक्षेप्रमाणे नाही. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता, गुजरातची लोकसंख्या किती? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? याचा विचार करायला हवा. गुजरातला १ कोटी लसी दिल्या व महाराष्ट्राला १ कोटी ४ लाख लसी दिल्या. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आहेत. आम्हाला एका आठवड्यासाठी लागणाऱ्या लसी द्या, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. ते याची दखल घेतील, अशी अपेक्षा असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

तर दररोज कोरोना रुग्णांची आकडेवारी मुंबई मनपा जाहीर करते. मात्र लसचा नेमका किती साठा मिळाला होता, त्यापैकी किती वापरला, किती वाया गेला, वाया जाण्याचे कारण, शिल्लक साठा अशी आकडेवारी मनपाकडून जाहीर झालेली नाही. लस पात्र व्यक्तींना ठरलेल्या प्राधान्यक्रमानुसार देणे अपेक्षित आहे. मात्र मुंबईसह महाराष्ट्रात या नियमाचे पालन झाले आहे का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. हेही वाचा - 

आणखी ३ नवी कोरोना केंद्रे लवकरच सुरू होणार

'या' वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा