Advertisement

महापालिकेची नवी भरती! रुग्णालय, प्रसूतिगृहात ८६७ जागा!

एकूण ८६७ पदे भरली जाणार असून यातील ९० टक्के पदे ही महापालिका नर्सिंग स्कूलमधून उत्तीर्ण झालेल्या मुलींमधून तर १० टक्के मुंबईतील इतर नर्सिंग स्कूलमधून भरली जाणार आहेत.

महापालिकेची नवी भरती! रुग्णालय, प्रसूतिगृहात ८६७ जागा!
SHARES

मुंबई महापालिका रुग्णालय आणि प्रसूतिगृह आदींमधील परिचारिका (नर्सेस) पदांच्या रिक्त जागांसाठी भरती परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण ८६७ पदे भरली जाणार असून यातील ९० टक्के पदे ही महापालिका नर्सिंग स्कूलमधून उत्तीर्ण झालेल्या मुलींमधून तर १० टक्के मुंबईतील इतर नर्सिंग स्कूलमधून भरली जाणार आहेत.


१४ मे अर्जाची शेवटची तारीख

परिचरिकांच्या रिक्त पदांसाठी येत्या १४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महापालिका कार्यकारी आरोग्य विभागाने केली आहे. यासाठी अर्ज १४ मे २०१८च्या आत कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका एफ दक्षिण विभाग कार्यलय, ३ रा माळा, आवक जावक विभाग, रूम नं ५६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई क्रमांक ४०००१२ या पत्यावर पाठवण्याचे आवाहन केले आहे.

शैक्षणिक पात्रता - महापालिका नर्सिंग शाळेतून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफेरी डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार असावी.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - १४ मे २०१८

महापालिका नर्सिंग स्कूलमधील उत्तीर्ण मुलींमधून निवडणार ७७९ उमेदवार

मुंबईतील इतर नर्सिंग स्कूलमधून निवडणार - ८८ उमेदवार

महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी विभागाकडून या बाबतची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी तुम्ही http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.हेही वाचा

न्यायालयीन कर्मचारी भरतीवरील बंदी उठली


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय