Advertisement

महापालिकेचं सबकुछ ऑनलाईन


महापालिकेचं सबकुछ ऑनलाईन
SHARES

मुंबई महापालिकेने ई-ऑफिसची अंमलबजावणी केल्यानंतर आतापर्यंत २८ सेवा नागरिकांसाठी ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. मात्र आता दुसऱ्या टप्प्यात आणखी २३ नवीन नोंदणी सेवा ऑनलाईन केल्या जातील. यासोबतच यासर्व ऑनलाईन सेवा या महिन्यात उपलब्ध करून दिल्या जातील.


महापालिकेच्या या सेवा ऑनलाईन

मुंबई महापालिकेच्या सर्व सेवा माहिती तंत्रज्ञानाशी सुसंगत करण्यात येत आहेत. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरी सेवांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता आणून २४ बाय ७ ऑनलाईन सेवा राबवण्यासाठी महापालिकेने धोरण बनवलं आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिकेने २८ सेवा नागरिकांसाठी ऑनलाईन केल्या आहेत. ज्यामध्ये सेवांचे नुतनीकरण, नवीन नोंदणी, कायदेशीर बदल, एकत्रिकरण इत्यादींचा अंतर्भाव आहे.

मुंबई महापालिकेचे ९८ टक्के व्यवहार हे नुतनीकरण आणि नवीन नोंदणी सेवा याबाबत होत असल्यामुळे त्या विकसित करण्यास विशेष प्राधान्य दिले जात आहे. नुतनीकरण सेवेबाबत महापालिकेचा ३६ टक्के महसूल अपेक्षित असलेल्या १० सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरोग्य, कारखाने आणि परवाना विभागासह वृक्ष छाटणी, लिटिगेशन मॅनेजमेंट सिस्टीम, ट्रेंचिंग अॅप्लिकेशन, आरईटीएमएस मॉड्युलबरोबरच करनिर्धारण आणि इमारती भोगवटा प्रमाणपत्रांच्या सेवाही अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. 


टप्पा २ मध्ये २३ नवीन नोंदणी सेवा

सर्व नागरी सेवा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून टप्पा २ मध्ये २३ नवीन नोंदणी सेवांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यामध्ये देवनार पशुवधगृह नोंदणीकरण, फलक परवाना, प्रोजेक्शन आणि स्टॉलबोर्ड परवाना, चित्रपट छायाचित्रण परवानगी इत्यादी सेवा विकसित करण्यात येणार असून हे काम या महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा