Advertisement

यशराज स्टुडियोत बेकायदा बांधकाम, महापालिकेने बजावली नोटीस

यशराज स्टुडियोमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत तसंच वाढीव बांधकाम झाल्याचं आढळून आल्यानं महापालिकेकडून स्टुडियोला नोटीस जारी करण्यात अाली अाहे. तसंच वाहनतळाचा कमर्शियल वापर केल्यामुळे महापालिकेनं ही नोटीस दिल्याचं समजतं.

यशराज स्टुडियोत बेकायदा बांधकाम, महापालिकेने बजावली नोटीस
SHARES

मुंबईतील नामांकित अशा यशराज स्टुडियोला मुंबई महापालिकेच्या वतीनं नोटीस जारी करण्यात आली आहे. यशराज स्टुडियोमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत तसंच वाढीव बांधकाम झाल्याचं आढळून आल्यानं ही नोटीस जारी करण्यात अाली अाहे. तसंच वाहनतळाचा कमर्शियल वापर केल्यामुळे महापालिकेनं ही नोटीस दिल्याचं समजतं.


मुंबईतील स्टुडियोंची झाडाझडती

कांजूरमार्ग इथल्या सिनेव्हिस्टा स्टुडियोला लागलेल्या आगीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या आगीमध्ये संपूर्ण स्टुडियो जळून खाक झाला होता. या आगीच्या दुघर्टनंतर मुंबईतील सर्व स्टुडियोंची झाडाझडती घेण्याचं काम महापालिकेच्या वतीनं हाती घेण्यात आलं अाहे. यामध्ये अंधेरी पश्चिम लिकिंग रोडजवळ असणाऱ्या प्रसिद्ध यशराज स्टुडियोची पाहणी केली असता, त्यामध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अंतर्गत बांधकामांमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झाल्याचं आढळून आलं आहे.


वाहनतळाच्या जागेचा कमर्शियल वापर

अंतर्गत भिंतींचं बांधकाम वाढीव करतानाच हे बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. तसंच वाहनतळाच्या जागेचा कमर्शियल वापर केला जात असल्याचं आढळून आल्यामुळं के-पश्चिम विभागाच्या वतीनं या स्टुडियोला नोटीस बजावण्यात अाल्याचं समजतं.


बांधकामांवर कारवाई होणार

या स्टुडियोला अनधिकृत बांधकामाबाबत आठ दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समजतं. जर स्टुडियोने एका महिन्याच्या आतमध्ये अंतर्गत वाढीव तसंच अनधिकृत बांधकाम स्वत:हून न तोडल्यास अाणि तळघराचा वापर कमर्शियलऐवजी पुन्हा वाहनांसाठी न केल्यास तेथील बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतं.


हेही वाचा - 

'टी सिरीज', 'यशराज'वर 'ईडी'चे छापे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा