Advertisement

'टी सिरीज', 'यशराज'वर 'ईडी'चे छापे


'टी सिरीज', 'यशराज'वर 'ईडी'चे छापे
SHARES

मुंबईतील नामांकित म्युझिक कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने छापे टाकल्याने चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. छापे टाकण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये टी सिरीज, युनिव्हर्सल, यशराज, सोनी, सारेगम यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि देशभरातील इतर कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.


छाप्यामागचं कारण काय?

या म्युझिक कंपन्यांनी 'शेल' (बनावट) कंपन्या बनवून मनी लाँड्रिंग केल्याच्या संशयावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून हे सर्च ऑपरेशन असल्याचं ईडी कडून सांगण्यात आलं आहे.



'यांनी' केली होती तक्रार

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि काही कलाकारांनी राॅयल्टी तसेच कामाचा मोबदला न मिळण्याबद्दल, नियमांच्या उल्लंघनाबद्दल इंडियन परफाॅर्मिंग राईट सोसायटी (आयपीआरएस) आणि फोनोग्राफीक परफाॅर्मन्स लि. (पीपीएल) २०१५ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) या कंपन्यांवर हे छापे टाकले आहेत.


कागदपत्रांनुसार पुढचा तपास

या धाडसत्रात जी कागदपत्रे ईडीच्या हाती लागतील, त्यानुसार तपासाची पुढची दिशा निश्चित होईल, असंही ईडीने स्पष्ट केलं आहे. सिनेसृष्टीशी संबंधित कंपन्यांवर पहिल्यांदाच अशी कारवाई होत असल्याने या संगितक्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा