Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! पालिकेकडून 120 सोसाट्यांवर गुन्हे दाखल

मात्र या उपाययोजना करण्यासाठी सोसायट्या, घरमालक सहकार्य करत नाहीत.

मुंबईकरांनो लक्ष द्या! पालिकेकडून 120 सोसाट्यांवर गुन्हे दाखल
SHARES

पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्व कामांमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे काम महापालिकेचा कीटकनाशक विभाग करत असतो. मात्र या उपाययोजना करण्यासाठी सोसायट्या, घरमालक सहकार्य करत नाहीत. 

महापालिकेने जानेवारी ते मे (२६ मेपर्यंत) या कालावधीत अशा १२० सोसायटी, घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सोसायट्या आणि घरमालकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दंडही ठोठावला आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे डास उत्पत्तीस्थाने नष्ट करा किंवा त्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराच महापालिकेने दिला आहे.

डासांची पैदास होऊ नये, यासाठी इमारतींवरील टाक्या डास प्रतिबंधक करणे, यासह अडगळीचे साहित्य निष्कासित करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात. यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून मोहीम चालवली जाते.

जानेवारी ते मेपर्यंत उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायटी, घरमालकांना नोटीस बजावून उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे आदेश दिले. यामध्ये बहुतांश नोटीस मलेरिया डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट न करण्याबाबतच आहेत.

३ हजार ७३८ पैकी १२० सोसायटी, घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मॅजिस्ट्रेट न्यायालयामार्फत दंड ठोठावण्यात आला आहे.

डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याविरोधात दंड ठोठावण्यात येतो. हा दंड दोन हजार रूपये ते १० हजार रूपयांपर्यंत असतो. आतापर्यंत ३ लाख ८२ हजार रूपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.



हेही वाचा

मुंबईत 11 जूनपर्यंत जमावबंदी

कुलाबा : बेसाल्ट दगडाचा वापर फुटपाथ बनवण्यासाठी होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा