Advertisement

कुलाबा : बेसाल्ट दगडाचा वापर फुटपाथ बनवण्यासाठी होणार

BMC 6 कोटी रुपये खर्च करणार

कुलाबा : बेसाल्ट दगडाचा वापर फुटपाथ बनवण्यासाठी होणार
SHARES

कुलाबा आणि काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण करण्याची योजना आहे. पालिका येथील फुटटपापाथवर बेसाल्ट स्टोन बसवणार आहे, जे वर्षानुवर्षे खराब होत नाहीत. यावर पालिकासुमारे 6 कोटी रुपये खर्च करणार आहे.

पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की संपूर्ण मुंबई सुशोभीकरण योजनेअंतर्गत विकसित केली जात आहे, परंतु आमचे विशेष लक्ष कुलाबा आणि आसपासच्या भागावर आहे. कारण, या भागात देशी-विदेशी पर्यंटक मोठ्या संख्येने येतात.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, हा दगड परदेशात विशेषतः युरोपियन देशांमध्ये वापरला जातो. हे दगड काळे आणि जड असतात. फूटपाथबरोबरच काळा घोड्याच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरही हे दगड बसवले जाणार आहेत. काळा घोडा आर्ट अॅव्हेन्यूच्या आजूबाजूला हेरिटेज लायटिंगही लावण्यात येणार असून त्यामुळे रात्रीच्या वेळी त्याचे सौंदर्य वाढेल.

विशेष म्हणजे कुलाब्याचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सूचनेवरून सहाय्यक आयुक्त (नियोजन) प्रशांत सपकाळे यांनी येथे बेसाल्ट दगड बसवून परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. कार्यादेश दिल्यानंतर (पाऊस वगळता) पुढील ६ महिन्यांत हे काम पूर्ण होईल.



हेही वाचा

उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई हायकोर्टाचे महापालिकेला महत्त्वाचे निर्देश

लोअर परळ उड्डाणपुलाची एक लेन 'या' महिन्यापर्यंत खुली होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा