'बोगस पॅथालॉजिस्टना रोखण्याचे काम आमचे नाही'

 Pali Hill
'बोगस पॅथालॉजिस्टना रोखण्याचे काम आमचे नाही'

मुंबई - मुंबईत बोगस पॅथालॉजी लॅबचा सुळसुळाट असून या बोगस पॅथालॉजी लॅबद्वारे

रूग्णांची आर्थिक लुट होत आहे, असं असताना या बोगस पॅथालॉजी लॅबला आळा घालण्याचे काम ज्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारात येते, त्या पालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र पॅथालॉजी लॅब आपल्या कार्यकक्षेत येतच नसल्याचे म्हणत हात झटकले आहेत.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथालॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टस संघटनेने 19 ऑक्टोबरला पालिका आयुक्त आणि महानगरपालिका स्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष अजोय मेहता यांना एक पत्र पाठवले होते. त्यानुसार बोगस पॅथालॉजी-क्लिनीकल लॅबॉरिटरीज चालकांवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमांतर्गत बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करावी, त्यासाठी लॅबचे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी केली होती. पण पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी ही बाब पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे या विभागाकडून अशी कारवाई वा सर्व्हेक्षण करता येणार नसल्याची माहिती मुंबई लाइव्हला दिली आहे. तर पॅथालॉजिस्ट संघटनेला पत्राद्वारे ही माहिती कळवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पॅथालॉजिस्ट हा वैदयकिय व्यवसाय असून कायद्यानुसार आरोग्य विभागावरच यासंबंधीची जबाबदारी असताना मुंबई पालिका असं उत्तर कसे देऊ शकते असा सवाल करत पॅथालॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डाँ. संदिप यादव यांनी पालिकेच्या या भूमिकेबद्दल साशंकता उपस्थित केली आहे. पालिका असे उत्तर देत बोगस पॅथालॉजी लॅब आणि बोगस पॅथालॉजिस्टना पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर पालिकेचे लेखी उत्तर मिळाल्यानंतर संघटना पुढची भूमिका घेईल,असेही यादव यांनी स्पष्ट केले आहे.

Loading Comments