'मे. मलबार सिटीझन्स फोरम'ला पालिकेची नोटीस

 Malabar Hill
 'मे. मलबार सिटीझन्स फोरम'ला पालिकेची नोटीस

मलबार हिल - प्रियदर्शिनी पार्कची जागा पालिकेला परत देण्याबाबत 'मे.मलबार सिटीझन्स फोरम' या संस्थेला पालिकेनं नोटीस बजावलीय. 'मे. मलबार सिटीझन्स फोरम' या संस्थेने करारातील अटी आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. मलबार परिसरातील सुमारे 65 हजार चौ.मी. एवढी जागा महापालिकेची आहे आणि त्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. प्रियदर्शनी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ एक पत्र्याचे शेड महापालिकेची परवानगी न घेता बांधण्यात आले आहे. या शेडचा उपयोग संबंधित संस्थेच्या कार्यालयासाठी होत असल्याचे आढळून आले आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता जागेचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचे निदर्शानास आल्यानं आम्ही ही नोटीस बजावल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान हे आरक्षण रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात संबंधित संस्थेने याचिका दाखल केली आहे.

Loading Comments