Advertisement

पेंग्विनच्या देखभालीसाठी वर्षाला साडेचार कोटींचा खर्च


पेंग्विनच्या देखभालीसाठी वर्षाला साडेचार कोटींचा खर्च
SHARES

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालयात (राणीबाग) दीड वर्षांपूर्वी दाखल झालेले नवीन पेंग्विन पक्षी आता सर्वांचंच आकर्षण ठरलं आहे. या पेंग्विनसाठी बनवण्यात आलेल्या पिंजऱ्याचं कंत्राट वादात अडकल्यानंतरही याचं काम अत्यंत चांगल्याप्रकारे झाल्यामुळे त्यांना आता इतर पक्ष्यांच्या पिंजऱ्यांचं काम सोपवण्यात आलं. परंतु पेंग्विन पक्ष्यांचं पिंजऱ्याचं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराला आता या पक्ष्यांच्या देखभालीची जबाबदारी सोपवली आहे. या देखभालीसाठी वर्षांला सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.


पेंग्विनसाठी सर्व सुविधा

राणीबागेतील प्राणिसंग्रहालयाच्या नुतनीकरणाचं काम सुरू असून दोन वर्षांपूर्वी ८ हॅम्बोल्ट पेंग्विन पक्षी दाखल झाले. या पेंग्विन पक्ष्यासाठी पिंजरा अर्थात पेंग्विन कक्ष व क्वारंटाईन कक्ष बनवण्यात आले आहे. हे पेंग्विन कक्ष वातानुकूलित असून त्यामध्ये पेंग्विन पक्ष्यांना खाण्यासाठी माशांचा पुरवठा, जीवरक्षक यंत्रणा व इतर देखभाल करण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे. यासाठी मेसर्स हायवे कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला पुढील तीन वर्षांचं देखभालीचं कंत्राट देण्यात येत आहे. या कालावधीसाठी सुमारे ११.५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.


पर्यटकांची संख्या वाढली

पेंग्विन पक्ष्यांच्या आगमनामुळे राणीबागेतील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये त्या पिलाचा मृत्यू झाला. त्यामुळे राणीबागेतील या नव्या पेंग्विनचं दर्शन मुंबईकरांना होऊ शकलं नाही. मात्र, या पेंग्विनची काळजी घेण्यासाठी त्यांना खाद्यपदार्थ आणि त्यांच्या पिंजऱ्यातील थंडावा कायम ठेवण्यासाठी वर्षांला सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जात अाहेत.


पेंग्विनसाठी १६ किलो मासे

राणीबागेतील पेंग्विनला दरदिवशी ४५० ते ५०० ग्रॅम एवढी रावस, तारली, बोंबिल आणि ईल मासळी खायला दिली जाते. त्यामुळे महिन्याला सातही पेंग्विन पक्षी १५ ते १६ किलोच्या मासळीचा फडशा पाडतात. या पेंग्विनला यापेक्षा वेगळ्याप्रकारची मासळी आवडत नसल्यामुळे उपलब्धतेनुसार यापैकी मासळी त्यांना खाऊ घातली जाते.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा