Advertisement

महापालिकेच्या २१५३ कर्मचाऱ्यांना मिळणार थकलेला पगार

मुंबई महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे सक्तीचे केल्यानंतरही ही हजेरी न नोंदवणाऱ्या महापालिकेच्या तब्बल ३ हजार ८०१ कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार थांबवले होते. पण आधार लिंक करणाऱ्या त्यातल्या २१५३ कर्मचाऱ्यांना आता पगार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या २१५३ कर्मचाऱ्यांना मिळणार थकलेला पगार
SHARES

मुंबई महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे सक्तीचे केल्यानंतरही ही हजेरी न नोंदवणाऱ्या महापालिकेच्या तब्बल ३ हजार ८०१ कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार थांबवले होते. परंतु, यापैकी तब्बल २१५३ कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर अखेर त्यांचे पगार देण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी परवानगी दिली आहे.


येत्या दोन दिवसांत मिळणार पगार

या सर्व कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबरचा पगार येत्या दोन दिवसांत बँक खात्यात जमा होणार आहेत. मात्र, सुमारे १ हजार ६०० कामगार, कर्मचाऱ्यांनी अजूनही बायोमेट्रिक हजेरीबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे त्यांचा नोव्हेंबरसोबतच डिसेंबरचाही पगार रखडणार आहे.


कर्मचाऱ्यांनी आधार लिंकच केले नाही!

मुंबई महापालिकेत बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमच्या माध्यमातून इ- हजेरी नोंदवण्यास सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात झाली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांच्या आधार कार्डची ऑनलाईन नोंदणी करून बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्यास सुरुवात झाली. परंतु, नोव्हेंबरपर्यंत तब्बल ३ हजार ८०१ कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपले आधार कार्डच लिंक केले नव्हते. त्यामुळे त्यांची बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जात नव्हती.


हजेरीच नाही, तर पगार कसला?

या ३ हजार ८०१ कर्मचाऱ्यांची हजेरीच नोंदवली जात नसल्यामुळे, त्यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार थांबवण्यात आला होता. बायोमेट्रिक हजेरी नाही, तर पगार नाही अशा प्रकारचा नियम करण्यात आला होता. यातील २ हजार १५३ कामगार, कर्मचाऱ्यांबाबत त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आधार लिंक न करण्याबाबत कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. ही कारणं मानव संशोधन विभागालाही देण्यात आली आहेत. यामध्ये काही कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले आहेत, काही कामगारांचे ठसे हे हाताची कातडी खराब झाल्यामुळे उमटत नाहीत, काही कर्मचारी हे सुट्टीवर आहेत, तर काही कर्मचाऱ्यांचे युआयडी सर्टिफिकेट सादर केले असूनही ते सिस्टीमवर नोंदवले गेले नव्हते.


अखेर आयुक्तांनी दिली मान्यता!

या २ हजार १५३ कर्मचाऱ्यांच्या कारणांचा खुलासा झाल्यानंतर त्यांचा थांबवण्यात आलेला पगार देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला महापालिकेला आयुक्त अजोय मेहता यांनी गुरुवारी सायंकाळी मान्यता दिली आहे. त्यामुळे या सर्वांचे पगार येत्या एक ते दोन दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


अजूनही १६०० कामगारांचे पगार अडकलेलेच!

मात्र, उर्वरीत सुमारे १ हजार ६०० कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या हजेरीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती खात्यांकडून वा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा पगार थांबवण्यात आले आहेत. त्यांच्या विभागाकडून कोणतीही माहिती किंवा कारणांचे स्पष्टीकरण न देण्यात आल्यामुळे त्यांचे डिसेंबरचे पगार देण्यात येणार नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

बायोमेट्रिक हजेरीत मराठीला दुय्यम स्थान, मनसेचा आंदोलनाचा इशारा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा