Advertisement

बायोमेट्रिक हजेरीत मराठीला दुय्यम स्थान, मनसेचा आंदोलनाचा इशारा


बायोमेट्रिक हजेरीत मराठीला दुय्यम स्थान, मनसेचा आंदोलनाचा इशारा
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमच्या माध्यमातून ई मस्टर अर्थात संगणकीय हजेरी नोंदवण्यास सुरुवात झाली असली, तरी यासाठी बसवण्यात आलेल्या यंत्रात मराठी भाषेला पाचव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. महापालिका कार्यालयात लावलेल्या या यंत्रामध्ये हिंदी भाषेला प्रथम आणि त्यानंतर बंगाली, कन्नड, तेलगू आदी भाषांनंतर मराठी भाषेला स्थान देण्यात आले आहे.  

या राज्याची मातृभाषा ही मराठी असून महापालिकेचे कामकाज हे १०० टक्के मराठीतूनच व्हावे, असा आग्रह धरणाऱ्या महापालिकेत या यंत्राद्वारे मराठी भाषेला पाचव्या क्रमांकावर स्थान दिल्यामुळे मनसेने तीव्र आक्षेप घेतला आहे. मराठी भाषेतील संदेश हा पहिल्या क्रमांकावर यावा, अशी मागणी मनसेच्या कामगार संघटनेने उपायुक्त सुधीर नाईक (सामान्य प्रशासन) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पद्धती लागू झाली असून यामध्ये बऱ्याचदा नेटवर्क नसल्यामुळे ई-हजेरी नोंदवताना कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. 


..तर विभाग कार्यालयांमध्ये आंदोलन

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील महापालिकेमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रक्रिया पूर्णपणे मराठीतून असावी. महापालिका आयुक्त या नात्याने ती आपली जबाबदारी आहे. ही मशिन तात्काळ न बदलल्यास सर्व प्रभागांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देशपांडे यांनी  दिला.

संदीप देशपांडे, अध्यक्ष, मनसे कामगार कर्मचारी सेना


केंद्र सरकारला पाठवणार पत्र

केंद्र सरकारने शिफारस केलेल्या कंपनीच्या वतीने या मशिन खरेदी करण्यात आल्या असून यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवले जाईल, असे आश्वासन महापालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी आपल्याला दिल्याचे मनसे कामगार कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांनी यावेळी सांगितले.



हेही वाचा

बायोमेट्रिक हजेरीला डॉक्टरांचाही ठेंगा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा