Advertisement

बायोमेट्रिक हजेरी नाही, तर पगार नाही!


बायोमेट्रिक हजेरी नाही, तर पगार नाही!
SHARES

'जो कर्मचारी बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणार नाही, त्यांचा पगार रोखून ठेवा', असे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्याने बायोमेट्रिक हजेरी न नोंदवल्यास त्यांना त्या महिन्याचा पगार मिळणार नाही. मागील ३ महिने प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक हजेरीची १ नोव्हेंबरपासून काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.


जुनी प्रथा रद्द

मुंबई महापालिकेत कामगार-कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती हजेरी पुस्तकावर नोंदवली जात होती. परंतु, ही प्रथा बंद करून महापालिकेने बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑगस्ट २०१७ पासून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काही तांत्रिक चुका लक्षात घेऊन पाहिले ३ महिने प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्यांनतर आता खऱ्या अर्थाने या निर्णयाच् काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.


आधारकार्डाद्वारे बायोमेट्रिक नोंद

मुंबई महापालिकेतील सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांपैकी ९४ हजार ४८२ कर्मचाऱ्यांनी आपला आधारकार्ड नंबर लिंक करून बायोमेट्रिक नोंद केली आहे. यासाठी महापालिकेने ३,९०० मशीन लावल्या असून अनेकदा नेट कनेक्ट होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना वाट पाहत उभे राहावे लागते. 


नियम सर्वांसाठी

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ३१ ऑक्टोबरला परिपत्रक जारी करून बायोमेट्रिक प्रणालीत उपस्थितीनुसार मासिक वेतनाची आकारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना आपली उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अंतर्गत नोंदवणे बंधनकारक आहे. सर्व प्रकारच्या रजा, बाहेरील काम, उशिरा येणे तसेच पगार थांबवणे आदी सर्व बाबींचा समावेश या प्रणालीत केला आहे.


पगार थांबवणार

बायोमेट्रिक प्रणालीत जे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार आपली उपस्थिती नोंदवणार नाहीत, अशा सर्व कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालयाची राहील. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीतच नोंदवावी आणि जे अशाप्रकारे उपस्थिती नोंदवणार नाही, त्यांचा मासिक पगार न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित खाते आणि विभागाची राहील, असेही आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.



हेही वाचा - 

बायोमेट्रिक हजेरीत मराठीला दुय्यम स्थान, मनसेचा आंदोलनाचा इशारा

बेस्ट कर्मचाऱ्यांचीही होणार बायोमेट्रिक हजेरी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा