Advertisement

स्थायी समिती अध्यक्षांना ६४० कोटींचा भरघोस निधी

२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्षांना (Standing Committee Chairman) ६४० कोटी रुपयांचा भरघोस अतिरिक्त निधी (fund) देण्यात आला आहे.

स्थायी समिती अध्यक्षांना ६४० कोटींचा भरघोस निधी
SHARES

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) महसूल (revenue) चांगलाच घटला आहे. असं असतानाही  २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्षांना (Standing Committee Chairman) ६४० कोटी रुपयांचा भरघोस अतिरिक्त निधी (fund) देण्यात आला आहे. या निधीतील मोठी रक्कम शिवसेनेला (Shiv Sena ) मिळणार आहे. शिवसेनेला १७० कोटी, भाजपाला (bjp) ९० कोटी, काँग्रेसला (congress) ७० कोटी, राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि समाजवादी पार्टीला प्रत्येकी २० कोटी रुपये निधी मिळणार आहे. 

 नगरसेवकांना (corporator) आपल्या प्रभागांमध्ये छोटी-मोठी विकासकामे करता यावी यासाठी पालिका प्रशासनाकडून स्थायी समिती अध्यक्षांना (Standing Committee Chairman) निधी देण्यात येतो. पालिकेतील  (Mumbai Municipal Corporation) संख्याबळानुसार प्रत्येक पक्षांना या निधीचे वाटप केले जाते. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना ६४० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. पालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ लक्षात घेऊन यशवंत जाधव यांनी या निधीचं वाटप केलं आहे. याखेरीज प्रभागात विकासकामे करता यावी यासाठी प्रत्येक नगरसेवकाला नगरसेवक निधी म्हणून एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

 स्थायी समितीने बुधवारी आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. आता स्थायी समिती अध्यक्ष (Standing Committee Chairman) आगामी वर्षांचा अर्थसंकल्प पालिका  (Mumbai Municipal Corporation) सभागृहात सादर करणार आहेत. दोन अपक्षांसह ८३ संख्याबळ असलेल्या भाजपला ९० कोटी रुपये तर  २९ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला मात्र, ७० कोटी मिळणार आहेत.  पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, तर समाजवादी पार्टीचे ६ नगरसेवक आहेत.  या दोन्ही पक्षांना प्रत्येकी २० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांमार्फत त्यांच्या नगरसेवकांना या निधीचं वाटप केलं जातं. त्याशिवाय २२७ नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये नगरसेवक निधी म्हणून देण्यात येणार आहेत. या निधीमधून नगरसेवकांना प्रभागातील छोटी-मोठी कामे विकासकामे करता येणार आहेत.  

पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची (Property tax) वसुली घसरल्याने लिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. मात्र, प्रशासनाने स्थायी समितीला तब्बल ६४० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध केला आहे. निधीच्या खैरातीवर विरोधी पक्षाने मात्र मौन बाळगलं आहे. 


हेही वाचा -

मालमत्ता कर थकबाकीदारांच्या वस्तू पालिका जप्त करणार

उच्चभ्रू वसाहतीतील नव्हे तर सर्वच नाले बंदिस्त करा, नगरसेवकांची मागणी

इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये मराठी माणूसच राहावा; डबेवाला असोशिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा