Advertisement

मालमत्ता कर थकबाकीदारांच्या वस्तू पालिका जप्त करणार

मालमत्ता कर (Property tax) हा पालिकेच्या (Mumbai municipal corporation) उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी पालिकेला अपेक्षित मालमत्ता कराची वसुली करता आली नाही.

मालमत्ता कर थकबाकीदारांच्या वस्तू पालिका जप्त करणार
SHARES

मालमत्ता कराची (Property tax) वसुली करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai municipal corporation) मागील काही दिवसांपासून मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांवर कडक कारवाई केली जात आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांसमोर पालिकेचे कर्मचारी ढोलताशे वाजवत आहेत. याशिवाय मालमत्ता कर न भरणाऱ्या इमारतींचं पाणीही कापण्यात आलं आहे. आता थकबाकीदारांची दुचाकी, चारचाकी वाहन, घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज आदी वस्तू ताब्यात घेतल्या जाणार आहेत. 

रोज ८० कोटी रुपयांचा मालमत्ता कर (Property tax) वसूल करण्याचं लक्ष्य पालिकेने ठेवलं आहे. मालमत्ता कर  वसूल करण्यासाठी पालिकेने (Mumbai municipal corporation) वॉर्ड स्तरावर अभियान सुरू केलं आहे. पालिकने मालमत्ता कर थकविणाऱ्या मेस्को एअरलाईन्सला चांगलाच दणका दिला. कराची थकबाकी वसूल करण्यासाठी या कंपनीची दोन हेलिकॉप्टर्स पालिकेने जप्त केली आहेत. मेस्को एअरलाईन्सने तब्बल १ कोटी ६४ लाख ८३ हजार ६५८ रुपयांचा मालमत्ता कर थकवला होता. थकबाकीदारांविरोधात पालिका आणखी कठोर कारवाई करत आहेत. वसुलीसाठी थकबाकीदारांच्या अचल संपत्तीबरोबर चल संपत्तीही जप्त केली जाणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहन, घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज आदी वस्तू ताब्यात घेतल्या जाणार आहेत. स्त्रीधन, जडजवाहीर, दागिने यांसारख्या वस्तू मात्र जप्त केल्या जाणार नाहीत. 

मालमत्ता कर (Property tax) हा पालिकेच्या (Mumbai municipal corporation) उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी पालिकेला अपेक्षित मालमत्ता कराची वसुली करता आली नाही.  चालू आर्थिक वर्षात ५५०० कोटींचा मालमत्ता कर मिळवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त ३१५४ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

महापालिकेने थकबाकीदारांची वॉर्डनिहाय टॉप टेन यादी तयार केली आहे. २४ पैकी १७ वॉर्डात टॉप टेन थकबाकीदार आहेत. त्यात बड्या बिल्डरांसह वैयक्तिक थकबाकीदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. या थकबाकीदारांनी तब्बल २६४४ कोटी रुपयांचा कर थकवला आहे.  सर्व थकबाकीदारांकडे  २८७७ कोटी ६६ लाख ३७ हजार ८११ एवढी थकबाकी होती. त्यापैकी फक्त २३३ कोटी १३ लाख ४३ हजार ७७८ रुपये वसूल झाले आहेत. तब्बल २६४४ कोटी ४८ लाख ९० हजार ३३ रुपये मालमत्ता कराची (Property tax) थकबाकी असल्यामुळे यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पाला धक्का बसून अनेक विकासकामांना कात्री लागली.हेही वाचा -

इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये मराठी माणूसच राहावा; डबेवाला असोशिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार- गृहमंत्रीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा