Advertisement

इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये मराठी माणूसच राहावा; डबेवाला असोशिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईचा डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील मराठी माणसाचा टक्का घसरतो आहे असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये मराठी माणूसच राहावा; डबेवाला असोशिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
SHARES

मुंबईतील शाळा, कॉलेज तसंच, कार्यालयांमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनीनिमित्त विविध उपक्रम राबवून मराठी भाषा दिनाची शोभा वाढवली जात आहे. तसंच, मुंबईचे डबेवालेही साजरा करत आहेत. मात्र, यावेळी मुंबईचा डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील मराठी माणसाचा टक्का घसरतो आहे असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. 

१९९७ साली अमराठी नगरसेवकांची मुंबई महानगर पालिकेत संख्या ४० होती. ही संख्या २०१७ साली ८५ झाली आहे. हा वेग असाच राहीला तर काही वर्षात मुंबई महानगर पालिकेत मराठी नगरसेवक दिसणं दुर्मिळ होणार आहे. याला प्रमुख कारण आहे मुंबईतुन मराठी माणुस विस्थापित होत आहेत, असं मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.

'मराठी माणुस हा प्रामुख्यानं चाळीत, झोपडपट्टीत रहातो. चाळींचा आणी झोपडपट्टीचा विकास होत असताना त्याला विकसित ईमारतीमध्ये नविन एक घर मिळतं पण सोबत भाऊ आणी त्यांचा प्रपंच ही असतो. त्यावेळी नाईलाजानं ते विकावं लागतं. तसंच, या विक्रीतून जितकी रक्कम येते त्या रक्कमेत तो मुंबई बाहेर २ घरं विकत घेतो. त्यामुळं तो मुंबईतुन विस्थापित होतोय’, असंही सुभाष तळेकर यांनी म्हटलं.

मराठी भाषा दिनानिमित्त सुभाष तळेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे की, '५०० स्वेअर फुट घर असणाऱ्यांना प्राॅपर्टी टॅक्स माफ करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्याचसोबत मराठी माणुस म्हणुन आम्ही मागणी करतो की यापुढं जेथे मुंबईत ईमारती अथवा झोपडपट्टी विकसित होईल, तेथ मराठी माणुसच असेल त्यांना त्यांच्या एक घर अथवा झोपडी ऐवजी विकसित २ घर देण्यात यावीत. यामुळं मराठी माणसांची प्रमुख अडचण दुर होईल व मराठी माणसांना मुंबईत २ घरं मिळतील व ते मुंबईतच राहातील'.



हेही वाचा -

नवी मुंबई राज्यातील सर्वात प्रदूषित शहर

मराठी भाषा गौरव दिन : राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये साजरा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा