Advertisement

नवी मुंबई राज्यातील सर्वात प्रदूषित शहर

नवी मुंबई हे २०१९ मध्ये राज्यातील सर्वात प्रदूषित शहर (most polluted city) असल्याचं उघड झालं आहे.

नवी मुंबई राज्यातील सर्वात प्रदूषित शहर
SHARES

उकाडा व थंड अशा वातावरणामुळं मुंबईसह (Mumbai) नवी मुंबईतील (Navi Mumbai) रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. त्यातच प्रदूषित वातावरणामुळं (Polluted environment) साथीच्या आजारांना बळी पडावं लागतं आहे. असं असताना, जगभरातील शहरांतील प्रदूषणाबाबतचा अहवाल (Report) प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये नवी मुंबई हे २०१९ मध्ये राज्यातील सर्वात प्रदूषित शहर (most polluted city) असल्याचं उघड झालं आहे.

जगभरातील प्रदूषित शहरांमध्ये नवी मुंबईचा (Navi Mumbai) क्रमांक ५१ वा आहे. तर मुंबईचा क्रमांक १६९ आहे. 'आयक्यूएअर' (IQAir) या स्वित्र्झलॅंड स्थित संस्थेनं २०१९ मधील प्रदूषणाच्या आकडेवारीवर आधारीत तयार केलेला जगभरातील ४ हजार ५०० शहरांचा अहवाल नुकताच प्रकाशित केला. या अहवालामध्ये हवेतील पीएम २.५ या घटकाचा आधार घेण्यात आला आहे.

अहवालानुसार जगभरातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांपैकी देशातील २१ शहरांचा समावेश होत आहे. तसंच, यामध्ये गाझियाबाद (Ghaziabad) हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याची माहिती मिळते. त्याचप्रमाणं या अहवालानुसार, राज्यातील प्रदूषित शहरांमध्ये नवी मुंबई पहिल्या क्रमांकावर असून, हवेतील पीएम २.५ घटकाचं प्रमाण ६१.६ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकं असल्याचं आढळलं आहे.

देशभरातील ९० शहरांतील प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार, नवी मुंबईचा २७ वा क्रमांक आहे. तसंच, मुंबई ५४ व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, मुंबईच्या हवेतील पीएम २.५ घटकांचं प्रमाण २०१८ पेक्षा कमी झालं आहे. २०१८ मध्ये पीएम २.५ चं प्रमाण ५८.६ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकं होतं. ते २०१९ मध्ये कमी होऊन ४३.५ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकं झालं आहे.



हेही वाचा -

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मराठी भाषा दिन : एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा