Advertisement

उच्चभ्रू वसाहतीतील नव्हे तर सर्वच नाले बंदिस्त करा, नगरसेवकांची मागणी

उच्चभ्रू वसाहतीलगतचे नाले (drainage) बंदिस्त करण्याच्या प्रस्तावास बुधवारी मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीत (Standing Committee) सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला.

उच्चभ्रू वसाहतीतील नव्हे तर सर्वच नाले बंदिस्त करा, नगरसेवकांची मागणी
SHARES

उच्चभ्रू वसाहतीलगतचे नाले (drainage) बंदिस्त करण्याच्या प्रस्तावास बुधवारी मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीत (Standing Committee) सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. यावेळी फक्त उच्चभ्रू वसाहतीलगतचे नव्हे तर, सर्वच नाले बंदिस्त करा, अशी मागणी नगरसेवकांनी (corporator) केली. जुहू (juhu) येथे बंदिस्त केल्या जाणाऱ्या नाल्याचा प्रस्तावही नगरसेवकांनी फेटाळून लावला.

जुहू-वेसावे लिंक रोडपासून एन. दत्ता मार्गापर्यंतचा अभिषेक नाला पॉलिकार्बोनेट शीटने बंदिस्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या  (Standing Committee) मंजुरीसाठी सादर करण्यात आला. या प्रस्तावावर नगरसेवकांनी (corporator) आक्षेप घेतला. उच्चभ्रू भागांत राहणाऱ्या लोकांना नाल्यातील घाणीचा त्रास सहन करावा लागत असल्याने त्या भागातील नाले (drainage) बंदिस्त करण्यास प्राधान्य दिल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला. झोपडपट्टी भागात नाल्यात सर्वाधिक कचरा टाकण्यात येत असल्याने येथील नाले बंदिस्त करणे आवश्यक असल्याचं मत नगरसेवकांनी व्यक्त केलं. ठराविक ठिकाणचे नाले बंदिस्त केल्याने नाल्यातील गाळ कमी होणार नाही. कोणत्या भागात नाल्यात जास्त कचरा टाकण्यात येतो, त्याचा अभ्यास करून ते नाले बंदिस्त करा, अशी मागणीही यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.

या मागणीवर नाले (drainage) बंदिस्त करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून जुलै महिन्यात त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली असल्याचं अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितलं. सहा मीटर रूंद नाल्यांसह ज्या नाल्यांच्या दोन्ही बाजूस आरसीसी भिंत आहे, असे नाले बंदिस्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर स्थायी समिती अध्यक्षांनी धोरणाच्या प्रतीसह पुढील बैठकीत सविस्तर उतर देण्याचे आदेश दिले.



हेही वाचा -

मालमत्ता कर थकबाकीदारांच्या वस्तू पालिका जप्त करणार

मॉलमधील एस्केलेटरमध्ये चिमुकल्याची तीन बोटं तुटली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा