Advertisement

जैन आहे! मासे, मटण विक्रीसाठी गाळे नाही बांधणार

एका कंत्राटदारानं जैन धर्मीय असल्यानं मासे आणि मटण विक्रीसाठी गाळे बांधणार नाही, असं धक्कादायक कारण महापालिका प्रशासनाला दिलं आहे.

जैन आहे! मासे, मटण विक्रीसाठी गाळे नाही बांधणार
SHARES

जैन पर्युषण काळात जैन समाजाचे बांधव व्रत करत असतात. त्यामुळं या दिवसात मांसविक्रीवर बंदी घालण्याची मागणी जैन समाजाकडून करण्यात येते. परंतु, एका कंत्राटदारानं जैन धर्मीय असल्यानं मासे आणि मटण विक्रीसाठी गाळे बांधणार नाही, असं धक्कादायक कारण महापालिका प्रशासनाला दिलं आहे. या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे.

संक्रमण शिबीर 

चेंबूरमधील व्ही. एन. पुरव मार्गावरील भाऊराव चेंबूरकर मंडईतील परवानाधारक विक्रेत्यांसाठी संक्रमण शिबीर बांधण्याचं महापालिकेनं ठरवलं आहे. या कामासाठी महापालिकेनं निविदा देखील मागवल्या. त्यावेळई निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या एका कंत्राटदारानं 'जैन असल्यानं मासे आणि मटण विक्रीसाठी गाळे बांधणार नाही' असं कारण दिलं.

धोकादायक स्थिती

चेंबूर येथील व्ही. एन. पुरव मार्गावरील भाऊराव चेंबूरकर मंडई ही धोकादायक स्थितीत असून, तिच्या पुनर्बाधणीची आवश्यकता आहे. त्यामुळं या मंडईतील विस्थापित परवानाधारक गाळेधारकांसाठी त्याच भूखंडावरील आजूबाजूच्या जागेवर संक्रमण शिबीर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनानं प्रक्रिया सुरू केली आहे. संक्रमण शिबीर बांधण्याचा प्रस्ताव वास्तुशास्त्रज्ञांना सादर करण्यात आला आहे.

संक्रमण शिबिराचे आराखडे

या प्रस्तावानुसार संक्रमण शिबिराचे आराखडे इमारत विभागाकडून मंजूरही करण्यात आले आहेत. त्यासाठी स्थापत्य कामं करण्यासाठी बाजार विभागानं निविदा मागवल्या होत्या. त्याला दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला होता. यामधील एका कंत्राटदारानं ८ टक्के कमी दरानं काम करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, मटण आणि मासे विक्रेत्यांसाठी पत्र्यांच्या शेडचं बांधकाम करण्यास नकार दिला.

अनामत रक्कम जप्त

कंत्राटदाराच्या या वादग्रस्त कारणामुळं त्याची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश स्थायी समितीनं दिल्याचं समजतं.



हेही वाचा -

सीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर धावणार खासगी कंपनीच्या लोकल?

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा