Advertisement

महापालिकेच्या १० सीबीएसई शाळांसाठी अर्ज मागवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

महापालिकेच्या १० शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू होणार असून या, शाळांमध्ये नर्सरी ते मोठा शिशुवर्गपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या १० सीबीएसई शाळांसाठी अर्ज मागवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
SHARES

महापालिकेच्या १० शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू होणार असून या, शाळांमध्ये नर्सरी ते मोठा शिशुवर्गपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये पहिली ऐवजी नर्सरीपासून (पहिलीपूर्वी तीन वर्षे) प्रवेश दिला जाणार आहे. त्याकरिता अर्ज मागवण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळं अनेक पालक आपल्या मुलांना सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या शाळेत प्रवेश घेतात. त्यामुळं महापालिकेनं महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार, गेल्या वर्षी जोगेश्वरी पूर्वेकडील पूनमनगरमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसईची शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून महापालिकेच्या आणखी १० शाळांमध्येही सीबीएसई शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागानं ठरवलं आहे.

या शाळांमध्ये आधी १ली ते ६वी असे वर्ग सुरू करण्यात येणार होते. मात्र, पालकांकडून व लोकप्रतिनिधींकडून नर्सरीपासून वर्ग सुरू करण्याची मागणी होऊ लागल्यामुळं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून नर्सरी ते मोठा शिशुवर्ग असे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. नर्सरी ते मोठा शिशुवर्गासाठी (सीनियर के जी) शिक्षकांची व्यवस्था शिक्षणाधिकारी कार्यालयातील लोकसहभाग कक्षाकडून करण्यात येणार आहे. बालवर्गाना शिक्षक पुरवणाऱ्या संस्थाकडून या शाळांसाठीही शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

भवानी शंकर रोड पालिका शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतीक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कुर्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व) या १० शाळांबरोबरच आधी सुरू असलेल्या जोगेश्वरीतील पूनमनगर शाळेत व वुलन मिल आयसीएसई शाळेत नर्सरीपासून वर्ग सुरू होणार आहेत.



हेही वाचा -

सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट, ७१ हजार बरे

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा