Advertisement

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी

कोरोना प्रतिबंधक लसीच्या दरांवरून देशपातळीवर प्रतिक्रिया उमटत असताना लस उत्पादक कंपन्यांनी लशीच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या करण्यात आल्याचं समजत आहे.

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी
SHARES

कोरोना प्रतिबंधक लसीच्या दरांवरून देशपातळीवर प्रतिक्रिया उमटत असताना लस उत्पादक कंपन्यांनी लशीच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या करण्यात आल्याचं समजत आहे. 

भारतीय लस उत्पादक कंपनी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युटने कमीत कमी किंमतीत कोरोना प्रतिबंधात्मक लस देशात उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून भारतातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती मिळू शकेल, अशी मागणी केंद्र सरकारने या दोन्ही कंपन्यांना केली असल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलं आहे. 

सध्या देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लस वितरीत करण्यात येत आहे. या दोन्ही कंपन्यांनी केंद्राच्या निर्देशानुसार आपापले दर नुकतेच जाहीर केले आहेत. त्यानुसार कोव्हॅक्सिन ही लस राज्यांना ६०० रुपयांना आणि खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांना देण्यात येणार आहे. तर कोविशील्ड केंद्र सरकारला १५० रुपयांना, राज्यांना ४०० रुपयांना आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना देण्यात येणार आहे. 

हेही वाचा- भावा तुझ्या कार्याला सलाम! ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 'या' खेळाडूनं केली ३७ लाख रुपयांची मदत

परंतु लस निर्मितीसाठी एकसारखाच खर्च येत असताना लस विक्रीच्या किंमतीत तफावत का? जी लस केंद्राला १५० रुपयांना मिळू शकते, ती राज्यांना ४०० रुपयांना का असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. परदेशात कमी किंमतींना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु भारतात लशींची किंमत जास्त असल्याचा दावा देखील अनेकांकडून केला जात आहे. 

येत्या १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील नागरिकांसाठीही लसीकरण उपलब्ध होणार आहे. या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात लशींची आवश्यकता भासणार आहे. केंद्राकडून पुरेशा प्रमाणात आणि जलदगतीने लसपुरवठा होत नसल्याने राज्यांना कंपन्यांकडून थेट लस विकत घेण्यावाचून पर्याय नसेल. 

(central government asks Serum Institute and Bharat Biotech to lower price of COVID 19 vaccines)

हेही वाचा- लसीकरणासाठी गर्दी होण्याची शक्यता, राज्य सरकारने रणनिती ठरवावी- देवेंद्र फडणवीसRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा