Advertisement

पाण्याच्या पुनर्वापरासह सेंद्रीय खत निर्मिती


पाण्याच्या पुनर्वापरासह सेंद्रीय खत निर्मिती
SHARES

करीरोड - एफ दक्षिण विभागात नव्यानं उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये इमारतीतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करुन त्याचा पुनर्वापर करणे, तसेच सोसायटीच्या स्तरावर ओल्या कचऱ्याचे विघटन करून त्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करणे बंधनकारक करण्यात आलंय. एफ दक्षिण विभागातील करीरोड स्टेशनजवळ असणाऱ्या महादेव पालव मार्गावरील'विघ्नहर्ता' आणि शिवडी परिसरातील 'अशोका गार्डन' या उंच इमारतींच्या परिसरात पालिकेच्या नियमांनुसार पाणी पुनर्वापर विषयक आणि कचरा व्यवस्थापन विषयक प्रकल्प यशस्वीपणे राबविले जात आहेत. यानुसार 'विघ्नहर्ता' मध्ये दररोज एक लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचे शुद्धीकरण केले जात आहे. तर 435 सदनिका असणाऱ्या 'अशोका गार्डन' मध्ये सुयोग्य कचरा व्यवस्थापन केलं जात असल्यानं येथून दररोज केवळ 20 किलो एवढाच कचरा महापालिकेच्या वाहनांना दिला जातोय. या प्रकल्पांच्या धर्तीवर इतर सोसायटींनी देखील आपल्या स्तरावर प्रकल्प राबवून महापालिकेला सहकार्य करण्यासोबतच पर्यावरण पूरकता जपावी अशी माहिती एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा