सात महिन्यांपासून पालिका कर्मचारी निलंबित

 Pali Hill
सात महिन्यांपासून पालिका कर्मचारी निलंबित

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या हुकुमशाहीचा फटका पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनविभागतील १९० कर्मचाऱ्यांना बसलाय. त्याच ठिकाणी पुर्नवसनाचा पर्याय होत नाही तोपर्यत इमारत खाली करणार नाही अशी भुमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे चक्क पालिकेनं या १९० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. गेल्या सात महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना ना पगार मिळला ना बोनस. दरम्यान शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सर्वच पक्षांनी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडत निलंबन मागे घेण्याची मागणी केली. मात्र पालिका उपायुक्त संजय मुखर्जी यांनी या प्रकरणाची चौकशी करून पुढच्या बैठकीत निवेदन देवू असे आश्वासन दिले. जोवर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर या प्रश्नी माघार घेणार नसल्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केलाय.

Loading Comments