Advertisement

अनधिकृत सिलिंडरविरोधात कारवाई पुन्हा सुरु


अनधिकृत सिलिंडरविरोधात कारवाई पुन्हा सुरु
SHARES

मुंबईतील सर्व हॉटेल्समधील अनधिकृत गॅस सिलिंडरविरोधात सुरु असलेली कारवाई मोहीम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडली होती. परंतु साकीनाका आग दुघर्टनेनंतर पुन्हा हॉटेल्ससह खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील अनधिकृत गॅस सिलिंडरविरोधात कारवाई हाती घेण्यात आली आहे. या कारवाईचा भाग म्हणून भायखळा, आग्रीपाडा आदी महापालिका ‘ई’ प्रभागातच एकूण ६२ अनधिकृत सिलिंडर जप्त करण्यात आली आहेत.


कुठे कारवाई?

महापालिकेच्या ‘ई’ विभागात २० ते २२ डिसेंबर २०१७ या दोन दिवसांत उपहारगृहांमधील अनधिकृत सिलिंडर साठ्यावर तसेच रस्त्यांवरील अनधिकृतपणे अन्न शिजवणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान उपहारगृहांमधून ५२ सिलिंडर्स, तर रस्त्यावर अनधिकृतपणे अन्न शिजवणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १० सिलिंडर्स याप्रमाणे एकूण ६२ सिलिंडर्स तसेच जप्त करण्यात आल्याची माहिती 'ई' विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी दिली आहे.


हुक्का पार्लरवर कारवाई

मुंबईत हुक्कापार्लर विरोधात नगरसेवकांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी येत असल्यामुळे या भागातील एका अनधिकृत हुक्कापार्लरवरही महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृतपणेच चालणाऱ्या एका हुक्का पार्लर मधील ३० खुर्च्या, ३ टेबल यासह सर्व साहित्य जप्त करण्यात येऊन हा हुक्का पार्लर बंद करण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.


पदपथ मोकळे

‘परिमंडळ १’ चे उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आग्रीपाडा, जे.जे. मार्ग, टँक पाखाडी मार्ग, के. के. मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, रामशेठ नाईक मार्ग, म्हातारपाखाडी मार्ग, पीरखान स्ट्रीट आदी ही कारवाई केली. यामध्ये १८ शेड्स, १० वाढीव बांधकामे, २ गॅरेज आदींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पदपथ व रस्ते मोकळे झाले असून याशिवाय या भागातील ८ पडिक वाहनेही जप्त करण्यात आल्याचे साहेबराव गायकवाड यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा-

साकीनाका आग दुर्घटना: सहायक आयुक्तांसह परवाना आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबईकरांनो, घरांमध्ये बसवा ‘मेन स्विच’सह एम.सी.बी.,एल.सी.बी.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा