पायधुनी विभागात पालिकेची कारवाई

 Paydhuni
पायधुनी विभागात पालिकेची कारवाई
Paydhuni, Mumbai  -  

मस्जिद - पालिकेने पायधुनी भागात आयआर रोड येथे अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या 15 दुकानांवर कारवाई केली. या सर्व दुकांनाबाहेर अनधिकृतरित्या ठेवण्यात आलेल्या सामानांवर आणि लहान स्टॉल्सवरदेखील या वेळी कारवाई करण्यात आली.

या भागात फर्निचर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात आपले सामान रस्त्यावर ठेवले होते. त्यामुळे ये-जा करण्यास नागरिकांना त्रास होत होता. त्याचबरोबर या भागात रस्त्याकडेला असलेल्या दुकानांमुळे वाहनचालकांनाही याचा फटका बसत होता. 

त्यामुळे हे दुकानदेखील येथून हटवण्यात आले. मात्र या कारवाईमुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. या कारवाईदरम्यान बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर आणि कनिष्ठ अभियंता अतुल लोंढेंसह इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Loading Comments