Advertisement

सकाळी दिल्या नवीन गाड्या, संध्याकाळी काढूनही घेतल्या, अधिकारी बुचकळ्यात!


सकाळी दिल्या नवीन गाड्या, संध्याकाळी काढूनही घेतल्या, अधिकारी बुचकळ्यात!
SHARES

मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांसाठी मागवण्यात आलेल्या नवीन गाड्या परस्पर चार अतिरिक्त आयुक्तांच्या कुटुंबांसाठी देण्यात आल्या होत्या. परंतु, या चारही गाड्या आता त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या असून त्याबरोबर दोन उपायुक्तांना दिलेल्या गाड्याही काढून घेण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या सातरस्ता येथील व्हीआयपी गॅरेजमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाटप केलेल्या नवीन गाड्या परत का घेतल्या? असा प्रश्न अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांनाही पडू लागला आहे.


३७ नव्या गाड्यांची खरेदी

महापालिकेच्या उपायुक्तांसह अन्य वापरासाठीच्या गाड्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेकडून मारुती कंपनीच्या ३७ वाहनांची खरेदी करण्यात आली. या सर्व गाड्या महापालिकेच्या सातरस्ता येथील व्हीआयपी गॅरेजमध्ये मागील १५ ते २० दिवसांपूर्वी दाखल झाल्या आहेत. यातील चार गाड्या मागील आठवड्यात चार अतिरिक्त आयुक्तांच्या कुटुंबांसाठी देण्यात आल्या होत्या. तसेच उपायुक्त रमेश पवार आणि सुधीर नाईक यांच्यासाठीही गाड्या देण्यात आल्या होत्या.


कामगारांसाठी पैसे नाही, गाड्यांसाठी आहेत

अतिरिक्त आयुक्तांच्या कुटुंबांना दिलेल्या गाड्या परत घेतल्याने त्या गाड्या अन्य कुणालाच द्यायच्या नाहीत, अशा सूडाच्या भावनेने या गाड्यांचे वाटप रखडून ठेवल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. कामगारांच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम, तसेच ओव्हरटाईम देण्यास महापालिकेकडे पैसे नाहीत, मात्र दुसरीकडे अतिरिक्त आयुक्तांच्या कुटुंबासह अधिकाऱ्यांना नवीन वाहने खरेदी केली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्येही कमालीचा संताप व्यक्त होताना दिसत आहे.


व्हीआयपी गॅरेज बनतोय जुगाऱ्यांचा अड्डा

महापौरांसह सर्व गटनेते आणि समिती अध्यक्ष तसेच आयुक्तांपासून सहायक आयुक्तांपर्यंत सर्वांची वाहने ही सातरस्ता येथील व्हीआयपी गॅरेजमध्ये उभी केली जातात. त्यामुळे या वाहनांचे चालक याठिकाणी जमा होत असतात. सर्व वाहने गेल्यानंतरही अतिरिक्त गाड्यांचे चालक तिथे असतात. हे चालक इथे जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याची तपासणी करण्यासाठी दक्षता विभागाच्या भरारी पथकाने भेट द्यावी, अशी मागणी काही वाहन चालकांकडून केली जात आहे.



हेही वाचा

महापौरांना निवासस्थान न मिळाल्यास...शिवसेना नगरसेवकांचा इशारा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा