Advertisement

मुंबई पूरमुक्त करण्यासाठी नाल्यावर बसवणार गेट पंप

मुंबई शहर २०३० पर्यंत पूर आणि आपत्तीमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनानं केला आहे.

मुंबई पूरमुक्त करण्यासाठी नाल्यावर बसवणार गेट पंप
SHARES

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत जास्तीचा पाऊस पडल्यास ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. महत्वाच्या रस्त्यांवर व गल्लोगल्ली पाणी तुंबल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत होते. परिणामी, पादचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. पावासाळ्यात होणाऱ्या या त्रासातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी महापालिका सतत प्रयत्न करत असते. मात्र, तरिही मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळं आता यातून कायमची सुटका करण्यासाठी मुंबई शहर २०३० पर्यंत पूर आणि आपत्तीमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनानं केला आहे. 

भरतीचा प्रभाव कमी करणे आणि सखल भागात साचणारे पाणी कमी करण्यासाठी नदी, नाले, खाडी, समुद्राच्या पातमुख्यांवर गेट पंप बसविण्यात येणार आहेत. तसंच, नाल्यांमध्ये गेटपंप बसविण्याबाबत प्लॅनिंग सुरू आहे. त्यामुळं तिवर तोडण्याची आणि पम्पिंग स्टेशनसाठी जागेचीही गरज भासणार नाही. समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी विले पार्लेजवळील ईर्ला, वरळीजवळील लव्हग्रोव्हसारख्या मोठ्या नाल्यांवर ‘बॅक रेक स्क्रीन्स’ बसविण्यात येणार आहेत.

तुंबलेल्या पाण्याच्या निचऱ्यासाठी फ्लड गेट बसविण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील मोठ्या मोऱ्यांमधील गाळ काढण्याचं काम सक्षमतेनं करण्यासाठी ‘हायड्रोझूम कॅमेरा’, रेल्वे-रस्ते मार्गावरील मोठ्या मोऱ्यांमधील गाळ कार्यक्षमतेनं काढण्यासाठी ‘रिमोट कंट्रोल्ड स्विंगलोडर’ मशीनची खरेदी करण्यासाठी २.६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

२०२० च्या पावसाळ्यासाठी मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदीमधून गाळ काढण्यासाठी अनुक्रमे ५० कोटी, ७० कोटी आणि १८ कोटींची तरतूद केली आहे. मुंबईत भरती आणि ओहोटीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास खोलगट भागात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळं पर्जन्य जलवाहिन्यांवर भरती-ओहोटीचा परिणाम होऊ नये यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मोगरा आणि माहुल इथं २ पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या दोन्ही पम्पिंग स्टेशनसाठी जमीन संपादन केल्यानंतर त्यांचं काम सुरू करण्यात येणार आहे. पम्पिंग स्टेशनसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दरवर्षीच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची आणखी नवीन ठिकाणं आढळून येतात. त्यामुळं महापालिकेनं पाणी तुंबणाऱ्या प्रत्येक ठिकाणचं सूक्ष्म नियोजन केलं असून, अशी एकूण २७३ ठिकाणं शोधून काढली आहेत. यापैकी २०४ परिसर पूरमुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय, आणखी ४५ स्थळं येत्या पावसाळ्यापूर्वी पूरमुक्त होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.


हेही वाचा -

एसटी प्रवाशांच्या तक्रारींच्या निरसनासाठी बसमध्ये आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक

राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार! पोलिसांना मिळणार १० हजार घरं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा