Advertisement

एसटी प्रवाशांच्या तक्रारींच्या निरसनासाठी बसमध्ये आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक

प्रवाशांच्या तक्रारी व समस्यांचं तातडीनं निरसन करण्याच्या उद्देशानं एसटी बसमध्ये आगारप्रमुख व विभागप्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित केले जाणार आहे.

एसटी प्रवाशांच्या तक्रारींच्या निरसनासाठी बसमध्ये आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांना (Issues) सामोरं जावं लागतं. या समस्यांबाबत प्रशासनाकडं वारंवार तक्रार (Complaint) करूनही दुर्लक्ष केलं जातं. मात्र, आता प्रवाशांची होणारी ही गैरसोय लक्षात घेत तसंच, प्रवाशांच्या तक्रारी व समस्यांचं तातडीनं निरसन करण्याच्या उद्देशानं एसटी बसमध्ये आगारप्रमुख व विभागप्रमुखांचे (Heads of Departments) दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित केले जाणार आहे. 

एसटी महामंडळाच्या या दूरध्वनी क्रमांक (Telephone no.) प्रदर्शित करण्याच्या निर्णयाची लवकर अंमलबजावणी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Transport Minister and MSRTC Chairman Anil Parab) यांनी दिले आहेत. त्यामुळं प्रवासांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - यंदाच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला ७६३८, पश्चिम रेल्वेला ७०४२ कोटींचा निधी

राज्यभरात दररोज एसटीनं सुमारे ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास किंवा प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाची असल्यास सध्या त्यांना संपर्क करण्यास अडचणी येत आहेत. ग्राहकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचं निराकरण त्या-त्या पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे.

हेही वाचा - कला, संगीत आणि नृत्याचा अविष्कार म्हणजे 'काळा घोडा फेस्टिव्हल २०२०'

यासाठी संबंधीत आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी आपलं उत्तरदायीत्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणं गरजेचं असल्याचं निर्देशात म्हटलं आहे. त्यामुळं एसटी बसमध्ये आगार प्रमुख व विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - आपल्यातील भांडण विसरा… अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याच्या उपक्रमाला प्रवाशांना आगार प्रमुख व विभाग प्रमुखांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, अनेकदा प्रवासी एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात तक्रारींसाठी फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, त्या प्रवाशांचा फोन उचलला जात नाही. त्यामुळं दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित केल्यावर प्रवाशांच्या समस्यांवर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

अखेर सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला

कोरोनाचे आणखी ४ संशयित रुग्ण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा