Advertisement

डाॅ. आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडांचा बळी?

दादर पश्चिमेकडील वीर सावरकर मार्गावरील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. या भू क्रमांक ३२४ वर एमएमआरडीएच्या माध्यमातून स्मारकाच्या बांधकामात अडसर ठरणाऱ्या ११६ झाडे काढण्याची परवानगी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणापुढे मागितली आहे. या ११६ झाडांपैकी ७९ झाडे कापली जाणार आहे, तर ३७ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहे.

डाॅ. आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडांचा बळी?
SHARES

मेट्रोच्या कामांसाठी बाधित होणारी झाडे कापण्यास शिवसेनेसह सर्वांकडून तीव्र विरोध होत असताना दादर पश्चिमेकडील इंडिया युनिट मिल नं ६ अर्थात इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बांधकामामध्ये तब्बल ११६ झाडे काढावी लागणार आहेत.

कामात अडसर

दादर पश्चिमेकडील वीर सावरकर मार्गावरील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. या भू क्रमांक ३२४ वर एमएमआरडीएच्या माध्यमातून स्मारकाच्या बांधकामात अडसर ठरणाऱ्या ११६ झाडे काढण्याची परवानगी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणापुढे मागितली आहे. या ११६ झाडांपैकी ७९ झाडे कापली जाणार आहे, तर ३७ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहे.

झाडांचा जाणार जीव?

यासंपूर्ण जागेवर एकूण २५० झाडे असून त्यातील ११६ झाडे काढावी लागणार आहे. तर उर्वरीत १३४ झाडे आहे तिथंच ठेवली जाणार आहे. मात्र ३७ झाडं पुनर्रोपित केली जात असली तरी प्रत्यक्षात पुनर्रोपित केलेली झाडं जीवंत राहिली अशी उदाहरणे नसल्यामुळे ही झाडेही मारलीच जाणार आहे. त्यामुळे एकूण ११६ झाडेही कापली तथा मारलीच जाणार असल्याचं वृक्ष प्रेमींचं म्हणणं आहे.

६ एकर जागा राखीव

इंदू मिलची जागा मार्च २०१७ मध्ये राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. सुमारे ४०० कोटी रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. एकूण साडेबारा एकर जमिनीवर हे स्मारक उभारलं जाणार आहे. ११.४ एकर जमीन ही स्मारकासाठी राखीव असून ६.४ एकर जागा ही सीआरझेडच्या बाहेर आहे. तर ६ एकर जागा ही सीआरझेडमध्ये आहे.

'या' जातीची कापली जाणार झाडं

मॅन्जिफेरा, पेरु, शेवगा, आंबा, सोन मोहर, फणस, गुलमोहर, अशोक, समुद्रफूल, जंगली बदाम, जांभूळ, पिंपळ, वड, रामफळ, सुभाबुळ, निम, उंदी, पुत्रंजिवा, गुंज, चाफा,

हेही वाचा-

आंबेडकर स्मारकाचं काम २०२० मध्ये पूर्ण होईल - मुख्यमंत्री

इंदू मिल स्मारकाला अजून 3 वर्ष लागणार!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा