SHARE

मुंबई – छत्रपती शिवाजी टर्मिनसची भव्यदिव्य, देखणी इमारत म्हणजे मुंबईकरांचेच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचेही आकर्षणाचे ठिकाण. त्यामुळे या इमारतीच्या आसपासचा परिसरही या इमारतीला साजेसा, देखणा असावा यासाठी आता मुंबई महानगरपालिका पुढे सरसावलीय. त्यानुसार येथील भूमिगत पादचारी मार्गाच्या चारही प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तर भूमिगत पादचारी मार्गावारील जूना घुमट काढून नव्याने घुमट बांधण्यात येणार आहे. येथील विद्यूत दिव्यांच्या जागी हायमास्ट दिवे बसवण्यात येणार आहेत. तसेच भाटीया बागेतील पाणपोईचा आकार कमी करत ड्रिंकींग वाँटर फाऊंटन तयार करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पालिकेनं याआधीच येथे व्ह्युइंग गॅलरी बनवण्याचा निर्णय घेतला असून, यासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. दरम्यान या सर्व कामांसाठी प्रशासकीय प्रस्ताव तयार करत या कामाला शक्य तितक्या लवकर सुरूवात करावी असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ए विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांनी शुक्रवारी या परिसराची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या