Advertisement

मुंबईच्या रस्त्यांवर चार कोटींचे डिव्हायडर


मुंबईच्या रस्त्यांवर चार कोटींचे डिव्हायडर
SHARES

मुंबई - खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्याऐवजी महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करत रस्त्यांवर दुभाजक अर्थात डिव्हायडर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांवर हे डिव्हायडर बसवण्यात येणार आहेत. हे डिव्हायडर सिमेंट काँक्रिटचे असतील. तसेच डिव्हायडरबरोबरच रस्त्यालगतच्या पदपथावर लोखंडी कठडेही बसवण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार पालिकेने हे काम हाती घेतले आहे. या कामासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे. बुधवारच्या स्थायी समितीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने या कामाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा