सार्वजनिक शौचालयांचा कायापालट होणार

 Pali Hill
सार्वजनिक शौचालयांचा कायापालट होणार
सार्वजनिक शौचालयांचा कायापालट होणार
सार्वजनिक शौचालयांचा कायापालट होणार
See all

मुंबई - महापालिका क्षेत्रात असलेल्या 17 हजार सार्वजनिक शौचालयांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. वीज आणि पाणी नसल्यामुळे या शौचालयांचा वापरच होत नाही. ही बाब मुंबई महानगरपालिकेच्या लक्षात आल्यानंतर याची दखल घेत तिथे वीज आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिले आहेत.

तसंच मुंबई महानगरपालिकेकडून 24 वॉर्डमध्ये 31 मार्च 2017 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यात म्हाडा, महापालिका, सरकारी यंत्रणा आणि खासगी सार्वजनिक शौचालये यांचाही समावेश आहे. तसेच इतर संस्थेद्वारे बांधण्यात आलेल्या शौचालयातसुद्धा वीज आणि पाण्याची सोय केली जाणार आहे. सुरुवातीच्या कालावधीपर्यंत भांडवल खर्च करण्याची जबाबदारी पालिकेनं घेतली आहे. यानुसार आवश्यक ती कार्यवाही मार्च 2017 पर्यंत होणे गरजेचे आहे. शौचालये सुस्थितीत आल्यानंतर ही शौचालये दैनंदिन परिरक्षणाकरिता वस्तीपातळीवरील संस्थांक़डे सोपवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापक खात्याचे प्रमुख अभियंता सिराज अन्सारी यांनी दिली.

Loading Comments