दोन हजार लीटर सांडपाण्याचा पुनर्वापर

 Mumbai
दोन हजार लीटर सांडपाण्याचा पुनर्वापर

मुंबई - सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलाय. त्यानुसार पुढील चार वर्षांत दोन हजार एमएलडी सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सात ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली जाणारायेत, अशी माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी दिली. कुलाबा, वरळी, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, जुहू या ठिकाणी ही केंद्र उभारण्यात येणारायेत.

सात धरणांतून मुंबईला पाणी पुरवठा होतोय. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्याकरता गारगाई आणि पिंजाळ धरणाचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र इथल्या पुनर्वसन आणि विस्थापनाचा प्रश्न मार्गी लागत नाहिये. त्यामुळे या धरणाचं पाणी मुंबईकरांना मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागेल, अशी कबुली यावेळी आयुक्तांनी दिली.

उपनगरात आणखी चार रुग्णालये

पश्चिम उपनगरात पालिकेचे एकही मुख्य रुग्णालय नाही. त्यामुळे उपनगरातील रुग्णांना शहरातील पालिकेच्या मुख्य रूग्णालयात धाव घ्यावी लागते. रुग्णांची ही गैरसोय दूर करण्यासाठी पश्चिम उपननगरात चार रूग्णालये उभारण्यात येणारायेत. त्यासाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आलीय. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिलीय.

Loading Comments