Advertisement

बोरिवलीत मिनी फायर स्टेशन उभारण्याचा पालिकेचा निर्णय

बोरिवली इथं एक मिनी फायर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बोरिवलीत मिनी फायर स्टेशन उभारण्याचा पालिकेचा निर्णय
(Representational Image)
SHARES

मुंबईतील आगीच्या घटनांची वाढती संख्या लक्षात घेऊन, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) बोरिवली (पूर्व) इथं एक मिनी फायर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बोरिवलीच्या पूर्वेला कोणतेही स्थानिक अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे, कोणत्याही आगीच्या किंवा संबंधित आपत्कालीन परिस्थितीत, कांदिवली किंवा दहिसर अग्निशमन केंद्रांकडून मदत मागवावी लागते.

आर/मध्य प्रभागातील सहाय्यक महापालिका आयुक्त, वकार जावेद यांनी सांगितलं की, अग्निशमन केंद्र बांधण्याची जबाबदारी इमारत बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर स्थानिक वॉर्ड ऑफिसनं त्यांच्याकडून त्यासाठीचा कार्यभार स्वीकारला. ज्या जमिनीवर ते बांधले जात आहे ती जमीन त्यासाठी राखीव होती. वर्षानुवर्षे कोणतीही कार्यवाही न केल्यानं, इमारत बांधकामाला अतिरिक्त वेळ लागला असता.

याच कारणास्तव प्रभाग कार्यालयानं जबाबदारी घेतली, अशी टिपण्णी जावेद यांनी केली. या प्रक्रियेला गती देण्यासाठी इमारत विभागानं निधी सुपूर्द केला आहे. दुसरीकडे, अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांचा असा विश्वास होता की, या परिसरात अग्निशमन केंद्राची गरज आहे.हेही वाचा

पालिका कार्यालयात १ जानेवारीपासून बायोमेट्रिक हजेरी लागणार

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा