Advertisement

खाडी, नद्यांवरील पुलांसाठी जलआलेखकाची नेमणूक


खाडी, नद्यांवरील पुलांसाठी जलआलेखकाची नेमणूक
SHARES

मुंबईतील अनेक भागांमध्ये खाडी आणि नद्यांमुळे नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागत असल्यामुळे आता यावर पुलाची उभारणी करण्याचा निर्णय महापालकेने घेतला आहे. त्यामुळे या खाडी तसेच नद्यांवर पुल बांधण्यासाठी जलआलेखक नेमून पाण्याखालील जमिनीच्या स्तराचा सर्व्हे केला जाणार आहे. या सर्व्हेसाठी गृहविभागाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाची निवड करण्यात आली आहे.


नदी, खाडीतील भूस्तराचं सर्वेक्षण होणार

शहरातील, तसेच पश्चिम उपनगरातील खाडी व नद्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी पुल बांधण्यात येणार आहे. या पुलाची उभारणी करण्यासाठी नदी व खाडीमधील पाण्यातील भूस्तराचं सर्वेक्षण करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण करण्यासाठी गृहविभागाच्या बंदर व परिवहन विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सागरी मंडळ जलआलेखकाची नेमणूक करण्यात आली आहे.


पाण्याखालील जमिनीचा स्तर तपासला जाणार

यासाठी शहर व पश्चिम उपनगरासाठी अनुक्रमे ५ लाख ८० हजार व १८ लाख ५६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. बऱ्याच ठिकाणी खाडी व नदीवर पुल उभारताना त्यातील पात्र मोठे असल्यामुळे पुल उभारण्यात अडचणी येतात. नदीच्या पात्रात बांधकाम करून अशा प्रकारचे पुल उभारणे शक्य असल्यामुळे या नदी व खाडीतील पाण्याखाली जमिनीचा स्तर कशा प्रकारे आहे? हे जाणून घेण्यासाठी या मंडळाची नेमणूक केल्याचे महापालिका पुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा