Advertisement

बुधवारच्या पालिका बैठकीत पेंग्विनवरून होणार राडा?

भायखळा प्राणीसंग्रहालयात पेंग्विनची देखभाल करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) १५ कोटींची निविदा सादर करणार आहे.

बुधवारच्या पालिका बैठकीत पेंग्विनवरून होणार राडा?
SHARES

भायखळा प्राणीसंग्रहालयात पेंग्विनची देखभाल करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) १५ कोटींची निविदा सादर करणार आहे. येत्या बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

२०१८ मध्ये, प्रशासकिय संस्थेनं ३ वर्षांसाठी पेंग्विनच्या देखभालीसाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती केली होती. टेंडरची मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपली. मुदत संपण्यापूर्वी, पालिकेनं नव्या टेंडरसाठी नवीन एजन्सी नेमली. तथापि, विरोधी पक्षानं पेंग्विनच्या संगोपनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्याबद्दल पालिकेची निंदा केली.

नवीन निविदेत त्यांनी पेंग्विनचा सर्व आवश्यक खर्च समाविष्ट केला आहे. नवीन पेंग्विन जन्माला आल्यास त्यांच्यावर जास्तीचा पैसा खर्च केला जात नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. निविदा रकमेत खर्च समाविष्ट केला जाईल.

पालिकेनं (BMC) आधीचा करार वाढवला आहे आणि नवीन करारासाठी एजन्सी (M/S महामार्ग) शॉर्टलिस्ट केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्यांना शॉर्टलिस्ट करण्यापूर्वी त्यांनी तीनदा निविदा काढल्या.

दुसरीकडे, काँग्रेसनं सांगितलं की, ते बैठकीत पालिकेच्या या प्रस्तावाचा विरोध करणार आहेत. त्यांच्यानुसार आधीच अनुभवी स्टाफ असताना ते खाजगी कंत्राटदारांवर का अवलंबून आहेत.हेही वाचा

दिव्यांगांना पालिका इलेक्ट्रिक सायकल पुरवणार

कोस्टल रोड प्रकल्पामुळे टाटा गार्डनमधील झाडांवर हातोडा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा