Advertisement

नाईट कर्फ्यूवर महापालिकेकडून लवकरच निर्णय

नाईट क्लब, पब किंवा बारमध्ये कोरोनाबाबतच्या नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं, तर रात्रीच्या वेळी नक्कीच संचारबंदी लावण्यात येईल, अशी दाट शक्यता आहे.

नाईट कर्फ्यूवर महापालिकेकडून लवकरच निर्णय
(Representational Image)
SHARES

ख्रिसमस आणि नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना मुंबईतील सेलिब्रेशन मूड देखील हळुहळू वाढू लागला आहे. त्यामुळं परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी खासकरून या दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये याकरीता मुंबई महापालिकेकडून शहरात नाईट कर्फ्यू लावण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं म्हटलं जात आहे.   

या दिवसांत कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढू नये म्हणून मुंबई महापालिकेकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच नाईट क्लब, पब, बार, रेस्टाॅरंटमध्ये रात्रीच्या वेळेस होणारी गर्दी आणि कोरोनाबाबतच्या नियमांचं होणारं उल्लंघन याचा महापालिकेकडून २० डिसेंबरपर्यंत आढावा घेण्यात येत आहे. या आढाव्यात जर नाईट क्लब, पब किंवा बारमध्ये कोरोनाबाबतच्या नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं, तर रात्रीच्या वेळी नक्कीच संचारबंदी लावण्यात येईल, अशी दाट शक्यता आहे.

हेही वाचा- कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई

कोरोनाच्या गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्यानं महापालिकेनं मुंबईतील ४ मोठ्या रेस्टॉरंट्सवर नुकतीच कारवाई केली आहे. पबमध्ये विना मास्क गर्दी करून हुल्लडबाजी करणाऱ्या २७५ जणांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बॉम्बे अड्डा, प्रीतम रुड लाऊन्ज, भगवती या ४ मोठ्या हॉटेल्सचा समावेश आहे.     

मुंबई महापालिकेच्या (bmc) अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात रविवारी रात्री एकूण दोन हॉटेलवर छापेमारी केली. त्यात बॉम्बे अड्डा या पबमध्ये विना मास्क आढळून आलेल्या २७५ जणांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर दादर येथील एका हॉटेलमध्ये १२० जणांकडून विना मास्क असल्याबद्दल दंड वसूल करण्यात आला. तर इतर २ हॉटेलमधून देखील दंड वसूल करण्यात आता. जवळपास चारही हॉटेलमधून ४३ हजार २०० रुपये इतका दंड वसूल झाला. 

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं आहे. मुंबईत करण्यात आलेल्या छापेमारीत हजारो लोकं मास्क न लावता क्लबमध्ये आढळून आले होते. लोकं असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. नागरिकांना १५ दिवसांचा वेळ दिलेला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारलं नाही तर आम्हाला नाईलाजानं नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल, असं चहल म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा