180 भूखंड पालिका घेणार ताब्यात

  Mumbai
  180 भूखंड पालिका घेणार ताब्यात
  मुंबई  -  

  मुंबई - पालिकेच्या मोकळ्या मैदानाच्या आणि उद्यान दत्तक देण्याच्या नव्या धोरणानुसार पालिकेचे मोकळे भूखंड ताब्यात घेण्यात येतायेत. त्यानुसार 216 पैकी 36 मोकळे भूखंड पालिकेनं ताब्यात घेतलेत. तर लवकरच उर्वरित 180 भुखंड ताब्यात घेणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी स्थायी समितीत दिली. यातील बरेच भूखंड हे शिवसेना नेत्यांच्या संस्थांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे विरोधकांनी भूखंड ताब्यात घेण्याची मागणी उचलून धरली. त्यामुळे आयुक्तांनीही भूखंड ताब्यात घेण्याचं जाहीर केलं. शिवसेनेसाठी ही मोठी चपराक ठरणार असल्याची जोरदार चर्चा पालिकेत रंगलीय.

  भूखंड ताब्यात घेण्यासाठी संस्थांना नोटीस बजावण्यात आल्यात. दरम्यान सर्वच्या सर्व भूखंड ताब्यात घेतले जाणारायेत. तरी ज्या भूखंडाची देखरेख योग्य प्रकारे होतेय असे भूखंड देखभाल तत्वावर संस्थेला वापरास देण्यात येणाराय, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.