या ब्रिजच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणाची?

 Mahim Railway Station
या ब्रिजच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणाची?
Mahim Railway Station, Mumbai  -  

माहिम रेल्वेस्थानकालगत असलेल्या पब्लिक ब्रिजची सध्या दुरावस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. माहिम रेल्वे स्थानकावरून शाहूनगरला जोडला जाणारा हा एकमेव पादचारी पूल आहे. 

मात्र या पुलाच्या दुरावस्थेकडे ना पालिकेचं लक्ष ना रेल्वे प्रशासनाचं. हा ब्रिज माहिम स्टेशन, माहिम पूर्व पश्चिमेला जोडत असून, धारावी, शाहूनगर,माटुंगा लेबर कॅम्प या विभागातील रहिवासी या ब्रिजचा वापर करतात. मात्र सध्या या ब्रिजची अवस्था इतकी खराब झाली आहे की, रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

डागडुजीट्या अवस्थेला आलेल्या या ब्रिजवरच्या लाद्या निघाल्या असून, स्टीलचे दुभाजक तुटूले आहेत. या तुटलेल्या स्टीलच्या रॉडमुळे पादचारी तसेच विद्यार्थी यांना धोकाही होऊ शकतो. समस्येचे माहेरघर असलेल्या या ब्रिजची देखभाल जी उत्तर विभागाकडे असून देखील जी उत्तर विभागाकडून मात्र दुर्लक्षच होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

याबाबत माहीम स्टेशनचे स्टेशन उपअधीक्षक एस ए चौधरी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी या ब्रिजवर ज्या लाईट्स आहेत त्या रेल्वेच्यावतीने लावले आहेत पण ब्रिजच्या देखभालीचे काम मात्र जी उत्तर विभागाचे असल्याचे सांगितले. पण आम्ही रेल्वेच्यावतीने लेखी तक्रार करू, असे देखील त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले. जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या निदर्शनास ही समस्या आणून देताच ते म्हणाले की, या विभागातील पादचाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी ब्रिजची लवकरात लवकर डागडूजी केली जाईल.

Loading Comments