Advertisement

तुळशी, मोडकसागर पाठोपाठ विहार तलावही भरले

विहार तलावातून कुर्ल्यासह इतर भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होतो. विहार आणि तुळशी तलाव भरलेले असले तरी त्यातील मोडक सागर या तलावातून अधिक प्रमाणात पाणी पुरवठा होतो.

तुळशी, मोडकसागर पाठोपाठ विहार तलावही भरले
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, मोडकसागर तलावापाठोपाठ विहार तलावही सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास वाहू लागला. विहार तलावातून दरदिवशी ६० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. विहार तलावातून कुर्ल्यासह इतर भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होतो. विहार आणि तुळशी तलाव भरलेले असले तरी त्यातील मोडक सागर या तलावातून अधिक प्रमाणात पाणी पुरवठा होतो. परंतु आता प्रतीक्षा आहे ती भातसा, मध्य वैतरणा आणि तानसा व अप्पर वैतरणा धरण भरण्याची.



किती पाणीपुरवठा?

मुंबईला तानसा, भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, तुळशी आणि विहार आदी ७ धरणांमधून प्रति दिन ३७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये एकूण साडेचौदा दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा वर्षभरासाठी अपेक्षित असतो. परंतु पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण क्षमता साडेचौदा दशलक्ष लिटर असून आजपर्यंत या सातही तलावांमध्ये ९ लाख ३४ हजार २११ लक्ष लिटर्स पाणीसाठा जमा झाला आहे.


गाठला १५ जुलैचा मुहूर्त

मोडकसागर तलाव रविवारी दुपारी ३.०५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागले. मागील वर्षी हा तलाव याच दिवशी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी वाहू लागला होता. त्यामुळे मोडक सागराने यंदाही १५ जुलैचा मुहूर्त साधण्याचा योग साधला होता. अप्पर वैतरणा आणि मोडक सागर या दोन्ही धरणांमधून मुंबईकरांना १०७० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो.



हेही वाचा-

खूशखबर! मुंबईकरांना पाणी पुरवणारा तुळशी तलाव भरला

मुंबईकरांच्या पाण्याची चिंता दूर, तलाव भरले तुडुंब



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा