Advertisement

खूशखबर ! मुंबईकरांना पाणी पुरवणारा मोडकसागर तलाव भरला


खूशखबर ! मुंबईकरांना पाणी पुरवणारा मोडकसागर तलाव भरला
SHARES

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी दोन तलाव आता काठोकाठ भरून ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील तलावक्षेत्रात झालेल्या पावसामुळं तुळशी तलावानंतर आता मोडकसागर तलावही ओव्हरफ्लो होण्यास सुरूवात झाली आहे.


चिंता मिटली

मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं मुंबईतील नागरिक काही प्रमाणात हैराण झाले होते. परंतु रविवारी मोडकसागर परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं मोडकसागर धरण भरून वाहू लागले. यामुळं मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.


रोज ३७५ कोटी लिटर पाणी

मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या सात तलावांमधून मुंबईकरांना दरदिवशी ३७५० दशलक्ष अर्थात ३७५ कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव असले तरीदेखील मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा हे पाच तलाव पाणीवितरण साखळीत अत्यंत महत्वाचे आहेत. कारण या तलावांची साठवण क्षमता मोठी असल्यानं त्यात सर्वाधिक पाणीसाठा जमा होतो. तर विहार आणि तुळशी या तलावांची पाणी साठवण्याची क्षमता फार कमी असल्यानं तेथील पाणीसाठा हा काही दिवसांपुरता पुरणारा असतो.


तुळशी तलावही भरला

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळं तुळशी तलावही पाण्यानं भरून काठोकाठ वाहायला लागला होता. त्यानंतर आता मोडकसागर तलावही ओव्हरफ्लो झाला असून मोडकसागर तलावाची उंची १६३.१५ मीटर इतकी आहे. तर या तलावात पाणी साठवण्याची क्षमता १ लाख २९ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. दरम्यान मोडकसागरही भरल्यानं आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकटही टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



हेही वाचा -

मुंबईला दूध कमी पडू देणार नाही- महादेव जानकर

मुंबईकरांनो, अजून संकट टळलेलं नाही!



 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा