Advertisement

मुंबईला दूध कमी पडू देणार नाही- महादेव जानकर


मुंबईला दूध कमी पडू देणार नाही- महादेव जानकर
SHARES

दुधाला प्रति लिटर २७ रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दूधकोंडी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार रविवारी रात्री या आंदोलनाला सुरूवात होणार अाहे.


कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई 

या आंदोलनात शेट्टीचं मुख्य लक्ष आहे ते मुंबईचं दुध रोखत सरकारला वेठीस धरण्याचं. त्यानुसार मुंबईत कुठल्याही मार्गे दुध येणार नाही हेच प्रयत्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं असणार आहे. त्यामुळे सोमवारच्या आंदोलनाकडे मुंबईकरांचं विशेष लक्ष लागल असून सोमवारी मुंबईकरांना दूध मिळणार का हाच प्रश्न आहे. पण राज्य सरकारनं मात्र आता पुढं येत मुंबईकरांना कोणत्याही परिस्थितीत दूध कमी पडू देणार नाही असं स्पष्ट केलं आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईला दूध कमी पडू दिलं जाणार नाही. तसंच कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन रविवारी स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिलं आहे.


दूध टँकर जाळण्याचा प्रयत्न

रविवारी रात्री १२ वाजता पंढरपुरातील विठ्ठलाच्या मुर्तीला दुधाचा अभिषेक करत स्वाभिमानीच्या दुधकोंडी आंदोलनाला सुरूवात होणार आहे. मात्र, त्याआधीच रविवारी दुपारीच अमरावतीत वरूडजवळील नागझिरी इथं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर अडवत टँकर फोडला आणि मग टँकरच्या चाकाला आग लावली. आंदोलन अधिकृतरित्या सुरू होण्याआधीच आंदोलक इतके आक्रमक झाले असून आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे आता सरकारनेही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.


उत्पादकांना अावाहन

कोल्हापुरमधील कार्यकर्त्यांसह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. तर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. यावर जानकर यांनी आंदोलकांना कडक इशारा देत कारवाईचे संकेत दिले आहेत. तर दूध उत्पादकांना सरकार संरक्षण देईल, त्यामुळं दुध उत्पादकांना न घाबरता सोमवारी दुधाचा पुरवठा करावा असं आवाहनही त्यांनी दुध उत्पादकांना केलं आहे. तर मुंबईला दूध कमी पडू दिलं जाणार नाही असं म्हणत मुंबईकरांना दिलासा देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे. दरम्यान शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना शांतेत आंदोलन करण्याचा आवाहन केलं आहे.



हेही वाचा - 

मुंबईकरांनो, आज जरा जास्तीचंच दूध खरेदी करा...

मुंबईकरांनो, अजून संकट टळलेलं नाही!

खार सबवेचा भाग कोसळल्याची अफवा, परेची वाहतूक विस्कळीत




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा