Advertisement

महापालिका शाळा दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च


महापालिका शाळा दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च
SHARES

मुंबईसह उपनगरातील अनेक मुलं महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत मुंबई महापालिकेनं ८ पालिका शाळांच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. शाळांच्या दुरूस्तीसाठी महापालिकेला २६ कोटी ४८ लाख रुपये खर्च येणार आहे. गुरुवारी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

स्ट्रक्‍चरल ऑडिट

महापालिकेनं सर्व शाळांचं स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आलं असून, बहुतांश शाळांची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. दरम्यान, शाळांच्या दुरुस्तीच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला नेहमीच लक्ष्य केलं आहे. शाळांच्या दुरूस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च अपेक्षित आहे.


दुरुस्तीचा निर्णय

महापालिकेनं ८ शाळांच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मरोळ येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी सर्वाधिक ४ कोटी ९५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मरोळसह अभ्युदयनगर काळाचौकी येथील शाळेच्या दुरुस्तीवरही ४ कोटी २९ लाख ६७ हजार रुपये, तर घाटकोपर येथील शाळेसाठी ३ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


दुरुस्तीचा खर्च


  • अभ्युयदयनगर - ४ कोटी २९ लाख
  • अंधेरी पश्‍चिम टाटा कॉलनी - ३ कोटी ६२ लाख
  • जागेश्वरी - १ कोटी ७२ लाख
  • विलेपार्ले - ३ कोटी १० लाख
  • मरोळ - ४ कोटी ९५ लाख
  • चिंबई बांद्रा - १ कोटी १६ लाख
  • सहार - ३ कोटी ७९ लाख
  • घाटकोपर - ३ कोटी ८२ लाखहेही वाचा -

घरात गांजाची लागवड करणाऱ्याला अखेर अटक

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीरसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा