घरात गांजाची लागवड करणाऱ्याला अखेर अटक

मुंबईतील माहूल परिसरातील एका घरात गांजाची लागवड करणाऱ्या टोळीतील दुसऱ्या सदस्याला पोलिसांनी अटक केली आहे.

घरात गांजाची लागवड करणाऱ्याला अखेर अटक
SHARES

मुंबईतील माहूल परिसरातील एका घरात गांजाची लागवड करणाऱ्या टोळीतील दुसऱ्या सदस्याला पोलिसांनी अटक केली आहे. फ्रेनिक्स राजैया (२६) असं त्याचं नाव असून, गुन्हे शाखेच्या कक्ष ३ने अटक केली आहे. फ्रेनिक्स राजैया हा 'हायड्रोपोनिक ग्रो' यंत्रणेचा वापर करून घरात गांजाची शेती करत होता. या प्ररकणी पोलिसांनी टोळीतील एका व्यक्तीला याआधीच अटक केली आहे.

गांजाच्या बिया

घरात गांजाच्या लागवडीसाठी फ्रेनिक्स राजैयानं संकेतस्थळावरून परदेशातून गांजाच्या बिया मागवल्या होत्या. त्यासाठी त्याने भारतात बंदी असलेल्या ‘बिटकॉईन’ या ‘क्रिप्टो करन्सी’द्वारे पैसे अदा केले होते. या प्रकरणी अधिक तपास करत पोलिसांनी फरार फ्रेनिक्स राजैया याला अटक केली आहे.

अमली पदार्थ

याआधी माहुल परिसरात शनिवारी संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाकडं पोलिसांना १ किलो गांजा आणि ५४ ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ सापडले होते. तपासावेळी पोलिसांनी माहुल परिसरातील घरावर छापा टाकून गांजाची शेती उद्ध्वस्त केली. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांमार्फत आणि तपास करून ही शेती करणाऱ्या फ्रेनिक्स याला अटक केली. त्याने ‘इंटरनेटवरील डार्क नेट’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘एम्पायर मार्केट’ या संकेतस्थळावरून एमडी आणि गांजाच्या बिया मागविल्या होत्या.



हेही वाचा -

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई : घाटकोपरमधल्या इमारतीला आग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा