Advertisement

पालिकेचे आठ नवे रात्रनिवारे


पालिकेचे आठ नवे रात्रनिवारे
SHARES

मुंबई - बेघरांच्या डोक्यावर रात्रीच्या वेळी छप्पर असावे, यासाठी मुंबई महानगरपालिका आठ नवे रात्रनिवारे उभारणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने जागा निश्चितीचे काम सुरू आहे. बेघरांसाठी याआधी पालिकेने आठ रात्र निवारे सुरू केले आहेत. त्यात आता आणखी आठ रात्रनिवाऱ्यांची भर पडणार आहे. नव्या आठ रात्रनिवाऱ्यांसाठी पालिकेकडून जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया संपल्याबरोबर रात्रनिवारा सुरू करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
याआधीच्या आठ रात्रनिवाऱ्यात 321 बेघरांची राहण्याची व्यवस्था नव्या आठ रात्र निवाऱ्यात मध्ये 229 बेघरांची राहण्याची व्यवस्था होऊ शकणार आहे. सध्या खेतवाडी, कामाठीपुरा, वानखेडे स्टेडियमलगत, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, मालाड पूर्व, बोरिवली पूर्व, मांटुगा या ठिकाणी आठ रात्रनिवारे कार्यरत असून, नवीन आठ रात्रनिवारे वरळी, धारावी, केनडी पुलाजवळ, जे.जे. पुलाजवळ, महालक्ष्मी, अंधेरी पूर्व आणि मालाड पश्चिम येथे उभारण्यात येणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा