Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

मुंबईत महापालिका उभारणार समुद्राचं पाणी गोडं करणारा प्रकल्प!

मनोरी इथं समुद्राचं २०० एमएलडी खारं पाणी गोडं करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबईत महापालिका उभारणार समुद्राचं पाणी गोडं करणारा प्रकल्प!
SHARES

मुंबईत मे आणे जून महिन्यात होणारी पाणीकपात टाळण्यासाठी मनोरी इथं समुद्राचं २०० एमएलडी खारं पाणी गोडं करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू उपस्थित होते.

याप्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत मागील काही वर्षांमध्ये पाऊस उशिरा दाखल होत असल्याने मे आणि जून महिन्यामध्ये महापालिकेला (bmc) १० ते १५ टक्के पाणीकपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारं पाणी गोडं केल्यास मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही. जगात अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे, तर काही देशांमध्ये अशा प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरु ठेवण्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा- यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णय

महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारं पाणी सहज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी होईल. मनोरी येथील पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोरी इथं शासनाचा भूखंड उपलब्ध आहे तसंच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विनाव्यत्यय पूर्ण होऊन मुंबईच्या नागरिकांना कपातीविना नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

मनोरी इथंं २५ ते ३० एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून २०० एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. निर्मिती खर्च ३ ते ४ पैसे प्रतिलिटर इतका खर्च येणार असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितलं.

हेही वाचा- मुंबई महापालिकेची ‘सॅप’ प्रणाली गुरुवारपर्यंत बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा