Advertisement

शिवडीमध्ये महापालिका उभारणार समाज कल्याण केंद्र

मुंबई महापालिका शिवडीतील १५२.७७ चौरस मीटरच्या खुल्या जागेत समाज कल्याण केंद्र उभारणार आहे.

शिवडीमध्ये महापालिका उभारणार समाज कल्याण केंद्र
SHARES

मुंबई महापालिका शिवडीतील १५२.७७ चौरस मीटरच्या खुल्या जागेत समाज कल्याण केंद्र उभारणार आहे. या समाज कल्याण केंद्र उभारण्यासाठी १.६२ कोटींचा खर्च येणार आहे. महापालिकेने या संदर्भात प्रस्ताव तयार केला असून, आगामी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.


सामाज कल्याण केंद्र

काही महिन्यांपूर्वीच शिवडीतील १५२.७७ चौरस मीटर या जागेमध्ये समाज कल्याण केंद्रासह २ मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार होतं. मात्र, काही कारणात्सव हे बांधकाम रखडले होते. या दुमजली इमारतीमध्ये एक हॉल, स्वतंत्र खोल्या, समारोह हॉल आणि एक अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसंच, या समाज कल्याण केंद्राचा उपयोग स्थानिक नागरिकांद्वारे करण्यात येणार आहे. 


मंजुरीची प्रतिक्षा

दरम्यान, या समाज कल्याण केंद्राचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मांडण्यात येणार असून त्याला मंजुरी मिळाल्यावर लगेचच समाज कल्याण केंद्राच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसंच, या कामाचं टेंडर मेसर्स ताक्शील इन्फ्रास्ट्रक्चर यांना दिलं आहे. त्याशिवाय, या केंद्राचे बांधकाम पुढील एका वर्षात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



हेही वाचा -

मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा स्वगृही परतणार

कळंब समुद्रावर गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा