Advertisement

'महापालिका रुग्णालयात प्रसूती करा, बाळासाठी मोफत कपडे, मच्छरदाणी मिळवा'

मुंबई महापालिका रुग्णालयात प्रसुतीकरता दाखल होणाऱ्या महिलांना बाळ झाल्यानंतर या बाळाला कपड्यांचा एक संच, मच्छरदाणी, नॅपकीन आदी वस्तू देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.

'महापालिका रुग्णालयात प्रसूती करा, बाळासाठी मोफत कपडे, मच्छरदाणी मिळवा'
SHARES

मुंबई महापालिका रुग्णालयात प्रसुतीकरता दाखल होणाऱ्या महिलांना बाळ झाल्यानंतर या बाळाला कपड्यांचा एक संच, मच्छरदाणी, नॅपकीन आदी वस्तू देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. मात्र, या योजनेचा लाभ रेशनकार्डवर नाव असणाऱ्या तसेच ज्यांचं माहेर मुंबईत आहे, अशा महिलांनाच न देता महापालिकेच्या रुग्णालयात प्रसुतीकरता दाखल होणाऱ्या प्रत्येक महिलेला देण्यात येईल, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.


'जननी शिशू सुरक्षा योजने'चा लाभ

राज्य शासनाच्या 'जननी शिशू सुरक्षा योजने'अंतर्गत महापालिका रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या महिलांना उत्तेजनार्थ ६०० रुपये देण्यात येतात. ही रक्कम वाढवून १ हजार रुपये करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

यावर महापालिका रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या महिलांना देण्यात येणारी उत्तेजनार्थ ६०० रूपयांची रक्कम वाढवण्याबाबत योग्य ते प्रयत्न केले जातील, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.


तामिळनाडूनही अशी योजना

तामिळनाडूच्या धर्तीवर मुंबई महापालिकेनेही महापालिका रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या महिलांच्या बालकांसाठी कपडे, मच्छरदाणी, नॅपकिन, तेल, साबण, खेळणी या वस्तूंचा संच भेट स्वरूपात देण्याची मागणी भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांनी केली होती. ही मागणी प्रथम अमान्य करण्यात आली. त्यामुळे या योजनेचा लाभ मुंबईत माहेर असणाऱ्या प्रसूत महिलांना देण्यात यावा, अशी सूचना आरोग्य समिती सदस्यांनी केली होती.

समिता कांबळे यांच्या सूचनेनुसार तसेच आरोग्य समिती सदस्यांच्या मागणीचा विचार करत महापालिका रुग्णालयात प्रसूतीकरीता दाखल होणाऱ्या महिलांना, नवजात अर्भकांसाठी तेल देणं वैद्यकीयदृष्ट्या उचित होणार नाही, असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. परंतु कपड्यांचा एक संच, मच्छरदाणी, नॅपकीन आदी वस्तू देण्याबाबतची सूचना स्वागतार्ह असल्याचं सांगत प्रशासन लवकरच ही योजना अंमलात आणेल, असं स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा