Advertisement

उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेला पुन्हा निविदा काढाव्या लागणार

उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेला पुन्हा निविदा काढाव्या लागणार आहेत. याआधी काढलेल्या निविदेत ठेकेदारांनी ४० टक्के कमी खर्चात काम करण्याची तयारी दाखविली आहे.

उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेला पुन्हा निविदा काढाव्या लागणार
SHARES

उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेला पुन्हा निविदा काढाव्या लागणार आहेत. याआधी काढलेल्या निविदेत ठेकेदारांनी ४० टक्के कमी खर्चात काम करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळं देखभालीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे स्थायी समितीनx प्रस्ताव फेटाळला. उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेनं अंदाजित केलेल्या रकमेनुसार, मुंबई शहर विभागासाठी ५९ कोटी, पश्चिम उपनगरासाठी २६ कोटी आणि ४६ कोटी पूर्व उपनगरासाठी खर्च करण्यात येणार होते.

उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेनं अंदाजित केलेल्या रकमेला निविदाकार प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळं तब्बल ४० टक्के कमी दरानं निविदा भरलेल्या ठेकेदारांना हे काम देण्यासाठी महापालिका प्रशासनानं १०० कोटींचा प्रस्ताव तयार केला. यावर आक्षेप घेत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबंधित ठेकेदार कामाचा दर्जा कसा राखणार? असा सवाल करीत प्रस्ताव परत पाठविण्याची उपसूचना मांडली.

महापालिकेनं नेमलेले ठेकेदार कोट्यवधी रुपये घेऊनही उद्यानांची चांगली देखभाल करीत नसल्याचं यावेळी सर्व सदस्यांनी सांगितलं. तसंच, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी देखील उद्याने-मैदानांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपये घेऊनही अनेक ठिकाणी ठेकेदार कामाचा दर्जा राखत नसल्याचं म्हटलं.

झांडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यासाठी तब्बल १५० कोटींचं कंत्राट देऊनही संबंधित ठेकेदार योग्यरीत्या काम करीत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अशा बेजबाबदार ठेकेदारांच्या कामांची तपासणी करावी, कामात हलगर्जीपणा केलेल्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समितीनं प्रशासनाला दिले आहेत.हेही वाचा -

‘या’ प्रकरणात फडणवीस यांना जामीन मंजूर

मेट्रो-३ बाधितांचं होणार पुनर्वसनसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा