Advertisement

मेट्रो-३ बाधितांचं होणार पुनर्वसन

कुलाबा-वांद्रे-सीप्झ (Colaba-Bandra-Sipze) या मेट्रो-३ (Metro-3) मार्गिकेच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बाधितांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे.

मेट्रो-३ बाधितांचं होणार पुनर्वसन
SHARES

मेट्रो बाधितांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ (Colaba-Bandra-Seepz) या मेट्रो-३ (Metro-3) मार्गिकेच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बाधितांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (MMRCL) काळबादेवी-गिरगाव परिसरातील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी कंत्राटदाराची (Contractor) नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच, पुढील साडेचार वर्षांत ३८ मजल्यांची इमारत (Building) उभी करण्याचं आव्हान आता वॅस्कॉन इंजिनीअर्ससमोर (Vascon engineers) असून, याबाबतचं स्वीकृतीपत्र कंपनीला देण्यात आलं आहे.

मेट्रो-३ च्या मार्गावर काळबादेवी (Kalbadevi) व गिरगांव मेट्रो स्थानकांसाठी (Girgaon Metro Station), या विभागातील ४२३ कुटुंबे व २८९ गाळ्यांचं पुनर्वसन करावं लागणार आहे. सद्यस्थितीत काळबादेवी येथील प्रकल्पग्रस्तांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलम आहे. मात्र, लवकरच या बाधितांना हक्काचं घर मिळणार आहे. या दोन्ही भागांतील पुनर्वसनाचं काम २ टप्प्यांमध्ये होणार असून, पहिल्या टप्प्यातील इमारतीचं काम ५४ महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.

या कामासाठी १३१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील २ इमारतींसाठी कंत्राटदार (Contractor) नेमण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तसंच, पुढील कंत्राटासाठी देखील वॅस्कॉन इंजिनीअर्सवर विश्वास दाखवला जाणार असल्याचं समजतं. मात्र, सध्यातरी वॅस्कॉन इंजिनीअर्सतर्फे (Vascon engineers) केवळ एकाच इमारतीचं बांधकाम होणार आहे. हे बांधकाम २ टप्प्यांत होणार असल्याची भूमिका एमआरसीएलनं (MMRCL) स्पष्ट केली आहे.

या कामांतर्गत ३८ मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर ९ सदनिका असणार आहेत. तसंच, या इमारतींमध्ये पुनर्विकास होऊ घातलेल्या प्रकल्पग्रस्तांना साधारण ४०५-५५० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सदनिका मिळमार असं 'एमआरसीएल'कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांच्या जनजागृतीसोबत नियमसक्तीची गरज

चीनमधून आईचा मृतदेह आणण्यासाठी डाॅक्टर मुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा